धुळे तालुक्यातील नंदाळे येथील गावातील युवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली की नंदाळे येथील फॉरेस्ट मधील गट नंबर २३० मधील दोन हेक्टर जमीन प्रत्येकी झाडे लावण्यासाठी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
त्यात त्यांनी म्हटले की नंदाळे शिवारातील फॉरेस्टचा जमिनीवर वेगवेगळे झाडे लावण्यासाठी जमिन द्यावी अशी मागणी नंदाळे येथील युवक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली ज्या जमिनीवर आंबा, सीताफळ, रामफळ ,झाडे लावून जंगल वाचवण्यासाठी संगोपन करू असे गावातील लोकांनी केले आहे.या संदर्भात अधिक माहिती अनिल वाघ यांनी प्रसारमाध्यमांना दिली निवेदन देतेवेळी चंद्रभान झाल्टे, चरणदास झाल्टे, अनिल वाघ,प्रकाश मोरे, ईश्वर निकम, श्रावण झाल्टे, गोकुळ झाल्टे, भूषण झाल्टे असे गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Social Plugin