शिवसेना भवन, मुंबई येथे शिवसेना तथा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी महाराष्ट्रातील सर्व ९ युवासेना विभागीय सचिवांची बैठक घेतली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी आढावा घेतला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी आदींसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीस उत्तर महाराष्ट्राचे युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, पश्चिम विदर्भ सचिव सागर देशमुख, कोंकणचे सचिव अविनाश राऊत, मंदार शिरसाठ, मराठवाडा सचिव अक्षय ढोबळे, विनायक चोथे, महेश खेडकर, पूर्व विदर्भाचे सचिव निलेश बेलखेडे, पश्चिम महाराष्ट्रचे अविनाश बलकवडे उपस्थित होते.


Social Plugin