रिपब्लिकन पक्षाच्या युवा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची नियुक्ती.

 




रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जळगाव जिल्हा पश्चिम युवा जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. मिलिंद सोनवणे हे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून,  त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.  त्यांच्या या कामाची दखल घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब.यांच्या आदेशान्वये पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रमेश जी मकासरे यांनी जळगाव जिल्हा पश्चिम युवा जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे.यावेळी पक्षाचे खान्देश विभागीय अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदाम सोनवणे.भुसावळ शहर अध्यक्ष सुनील ढिवरे हे उपस्थित होते.  या निवडीबद्दल पश्चिम जळगाव जिल्हा अध्यक्ष आनंद जी खरात, युवा जिल्हा अध्यक्ष भगवान सोनवणे, यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे, अरुण गजरे, रावेर तालुका अध्यक्ष विकी तायडे, बोदवड तालुका अध्यक्ष समाधान वाघ, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष बोदडे, अमळनेर तालुका अध्यक्ष यशवंत बैसाणे,पारोळा तालुका अध्यक्ष अशोक कापडने, एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर, भडगाव तालुका अध्यक्ष अण्णा खेडकर, पाचोरा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, जिल्हा सचिव भरत मोरे, शहराध्यक्ष भैया बागवान, महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जळगाव उपाध्यक्ष यशवंत घोडेस्वार, अक्षय मेघे, किरण गव्हाणे, अविनाश पारधे, मुकेश सपकाळे, पंकज सोनवणे, प्रवीण वाघ, दिनेश सोये, गोलू सोनवणे, कुणाल भावसार यांनी अभिनंदन केले आहे.