जळगावच्या विद्यार्थ्यांनी घेतली युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट





सोमवार दि. 24 जून 2024 रोजी शिवसेना भवन मुंबई येथे इंटर्ननेशन लिडरशिप टूर च्या माध्यमाने जळगावसह देशातील 37 विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना तथा युवासेना सचिव वरूण सरदेसाई, युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया देखील उपस्थित होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, पारूल विद्यापीठ, जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जी. एच. रायसोनी महाविद्यालय तसेच त्रिमुर्ती महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. 




सुशासन, क्लायमेट चेंज, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, जॉब क्रिएशन इ. विषयांवर चर्चा संपन्न झाली.