धुळे प्रतिनिधी.
जिल्ह्यात पोलीस भरती सन २०२२-२३ करीता पोलीस घटकासाठी एकूण दोन हजार चारशे ७५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले असून, यात एक हजार तीनशे पुरुष, २६ माजी सैनिक व ५४६ महिला उमेदवारांच्या समावेश आहे. पोलीस भरतीची मैदाणी चाचणी दि. १९ ते २३ रोजी घेण्यात येणार आहे.रोज ५०० उमेदवारांना शारीरिक मोजमाप ,कागदपत्र पडताळणी व मैदाणी चाचणी करीता बोलावण्यात येणार असून शेवटच्या दिवशी महिला उमेदवारांना बोलविण्यात येणार आहे.
पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत तठस्थपणे , निपक्षपातीने व पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे.त्यासाठी मैदानावर प्रत्येक इव्हेंन्टकरीता सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले.आहेत. संपूर्ण भरती प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे .तसेच बायोमॅट्रिक पद्धतीने उमेदवारांची हजेरी घेण्यात येवून त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. जेणेकरून भरती प्रक्रियेत डमी उमेदवारांचा समावेश होणार नाही. यांची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पाहणी दरम्यान दिली.तसेच पोलीस भरती प्रक्रियेत भाग घेतलेल्या उमेदवारांची प्रथम ५० गुणांची मैदाणी घेण्यात येणार आहे.त्यात १०० मीटर ,१६०० मीटर धावणे व गोळाफेक अशा प्रकारांचा समावेश आहे मैदाणी चाचणीत उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५० % गुण आवश्यक आहेत .तसेच मैदाणी चाचणीमध्ये कमीत कमी ५०% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांमधून प्रवर्गनिहाय १:१० या प्रमाणानुसार उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे .लेखी परीक्षा ही १०० गुणांची मराठी भाषेत घेण्यात येणार असून तिचा कालावधी ९० मिनिटांचा असणार आहे . त्यात अंकगणित , सामान्यज्ञान,चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, व मराठी व्याकरणाचा समावेश असणार आहे. लेखी परीक्षा ही ओ.एम .आर पद्धतीने घेण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये देखील किमान ४०% गुण मिळवणे अनिवार्य आहे. ४०% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार हे अपात्र ठरणार आहेत.भरती प्रकिये दरम्यान पाऊस आल्यास उमेदवारांना त्यांचे शारीरिक मोजमाप, कागदपत्र पडताळणी व मैदाणी चाचणी साठी पुढील तारीखेबाबत नियोजन करण्यात येईल.पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तयारी सद्या युद्ध पातळीवर सुरू आहे.शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १९ तारखेला होणाऱ्या मैदाणी चाचणीची तयारी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पूर्ण झाली असून , या भरती प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मात्र दुसरीकडे पावसाळ्यात होणाऱ्या मैदानी चाचणीला कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात यावी. अन्यथा मैदानी चाचणीची प्रकिया दोन महिने पुढे ढकलावी, तसेच वयोमर्यादा वाढी संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही .तो देखील त्वरित घ्यावा.अशी मागणी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.


Social Plugin