जळगाव - एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही २ ऑगस्ट रोजी संत नामदेव महाराज यांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे.
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन एकता शिंपी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले आहे. संजीवन समाधी सोहळ्याची तयारी पूर्ण झालेली असून सकाळी १० वाजता सुभाष चौकातील श्री महालक्ष्मी मंदिर येथून मिरवणुकीस व पालखीस प्रारंभ करण्यात येईल. संतांच्या पालखीचे पुजन अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्था उपाध्यक्ष श्री शिवाजीराव शिंपी व उद्योग आघाडी उपप्रमुख दिपक निकुंभ यांचे हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहें. यांचबरोबर महालक्ष्मी पूजन समाजाध्यक्ष चंद्रकांत जगताप यांचे हस्ते सपत्नीक होईल. त्यानंतर संतांच्या मिरवणुकीस सुरुवात होणार आहें. मिरवणूक सुभाष चौक मार्गे सराफ बाजार,रथचौक येथून बालाजी मंदिर देवस्थान येथे समारोप होईल त्याच ठिकाणी समाज बांधवांना महाप्रसाद दिला जाईल.
मिरवणुकीच्या अग्रभागी सजविलेल्या बग्गीवर संत नामदेव महाराज यांची प्रतिमा आरूढ करण्यात येणार आहें. नंतर संताची पालखी राहील यावेळी महीला मंडळ, पदाधिकारी संत नामदेव व विठ्ठल भक्तीचे गजरात हातात टाळ घेऊन भक्ती भावात रंगून नृत्य सादर करणार आहे.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी समाजाध्यक्ष चंद्रकांत जगताप उपाध्यक्ष जितेंद्र कापडणे सचिव सुजित जाधव कार्याध्यक्ष किशोर निकुंभ कोषाध्यक्ष प्रशांत कापूरे मार्गदर्शक मोहन सोनवणे श्रीराम सोनवणे सतिश सोनवणे शरद कापडणे यांचेसह महीला अध्यक्ष सारीका शिंपी उपाध्यक्ष भारती निकुंभ सचिव रेखा कापडणे सहसचिव वैशाली जाधव कार्याध्यक्ष मनिषा निकुंभ सुनिता शिंपी आशा जाधव प्रमिला सोनवणे इत्यादी परीश्रम घेत आहेत


Social Plugin