खांडबारा रेल्वे सल्लागार समितीची बैठक संपन्न

 



नंदुरबार प्रतिनिधी



खांडबारा रेल्वे सल्लागार समितीची महत्वाची बैठक नुकतीच संपन्न झाली. खांडबारा रेल्वे अधीक्षक व वाणिज्य निरीक्षक यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खांडबारा येथील रेल्वे स्टेशन संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सुरत अमरावती रेल्वे खांडबारा स्टेशन येथे थांबवणे, एलसी गेट नंबर ८२ वर कवर सेंट देणे, सुरक्षा रक्षक म्हणून २४ तास RPF ची व्यवस्था करणे, खानदेश  एक्स्प्रेस थांबवणे, सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या  दरम्यान सुरत जाणारी गाडी चालवणे, रेल्वे स्टेशन वर सीसीटीव्ही कॅमेरा लावणे, लोकल ट्रेन व मेमो मध्ये रेगुलर  टीसीची नियुक्ती करणे, या सर्व मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले, यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे भूपेंद्रसिंग राजपुत, वरून गावित, शरीफ बागवान, डॉ किशोर पाटील ,प्रमिला पाडवी आदी उपस्थित होते.