महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना जाहीर करा - सुभाष कोटेचा

 




महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे. समाजातील गोरगरीब तळागाळातील बहिणींना आणि बेरोजगार भाऊंना या योजनेद्वारे मदतीचा हात दिल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे आम्ही एबीसीडी असोसिएशन तर्फे जाहीर आभार मानतो. परंतु ,शासन समाजाच्या सर्व घटकांकडे बारकाईने लक्ष देत आहे. त्यांच्या कल्याणासाठी भागीरथ प्रयत्न करीत आहे .तसेच महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांकडे महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावे. व महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांसाठी पेन्शन योजना त्वरित जाहीर करावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर असोसिएशन ऑफ बिझनेस अँण्ड कॉमर्स , एबीसीडी या व्यापारी संघटनांच्या वतीने करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सुभाष कोटेचा , उपाध्यक्ष गोकुळ बधान , खजिनदार सुधाकर पाचपुते, सचिव किशोर  गिंदोडीया, आदींसह  पदाधिकारी आदी उपस्थित होते.