अनुष्का सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी रक्तदान शिबीर व वृक्षारोपण.

 




अनुष्का सेवाभावी संस्थेच्या वतीने  21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता गजानन महाराज मंदिर बांभोरी येथे  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळेस आठ ते दहा रक्तदात्यांनी भाग घेतला.  तसेच मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.




 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष अण्णा महाराज, नानाभाऊ बोरसे ,डॉ.राहुल चौधरी, डॉ. दिलीपराव ढेकळे, सामाजिक कार्यकर्ते दीपकजी गुप्ता, कवी बी. एस. व्हडगर संस्थेच्या सचिव वैशाली व्हडगर, योगेश सुतार, प्रवीण पाटील, अशोक घाडगे, तुषार जी वाघुळदे, प्रकाश पाटील, सोमनाथ खरोटे, शाहिद खाटीक, हिम्मत बाविस्कर आणि अन्य वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी वड ,पिंपळ ,चिंच ,बेल आधी वृक्षाची लागवड करण्यात आली. त्यानंतर संस्थेच्या वतीने ठीक 3.30 वाजता पळसोद येथील रामेश्वर मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.  यावेळी चित्रकार योगेश सुतार, तुषार वाघुळदे, कवी बी.एस.व्हडगर, हिम्मत बाविस्कर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


संस्थेच्या वतीने राबविले जातात  दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम. 


अनुष्का सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, महापुरुषांच्या जयंती साजरी करणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविणे, असे अनेक उपक्रम राबविले जात असतात.