धुळे - धुळे औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारा तलाव कोरडा पडल्याने सद्यस्थितीत औद्योगिक वसाहतीतील सुमारे ४०० उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. धुळे औद्योगिक वसाहतीला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये म्हणून स्वतंत्र हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे.या योजनेची निविदा प्रक्रिया पार पाडण्यात आली असून कामाचा कार्यादेश देणे बाकी आहे.एकूण पाण्याची भिषण परिस्थिती पाहता कार्यादेश देवून काम सुरु करणे आवश्यक आहे.तसेच रावेर येथील जमीन अधिग्रहित करणे संदर्भात आ.फारुख शाह यांच्या मागणीनुसार दि. २ जुलै रोजी ना.उदय सामंत यांच्या दालनात बैठक बोलाविण्यात आली होती.या बैठकीत दोन्ही विषयावर चर्चा करण्यात येवून पुढील आठवड्यात पाणीपुरवठा योजना कामाचे कार्यारंभ आदेश देवून प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात यावा आणि रावेर येथील जमीन अधिग्रहण बाबत महसूल मंत्र्यांकडून तातडीने प्रस्ताव मंजूर करून घेण्याचे निर्देश ना.उदय सामंत यांनी दिले.
आ.फारुख शाह हे गेल्या ४ वर्षांपासून धुळे औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने रावेर येथील जमीन अधिग्रहण करण्याची मागणी करीत आहेत.यापूर्वी मालेगाव येथील विभागीय आढावा बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी तसे आदेश प्रशासनाला दिले होते.नागपूर हिवाळी अधिवेशन काळात देखील या मुद्द्यावर विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. रावेर शिवारातील जमीन अधिग्रहणातील मुख्य अडसर वनविभागाचा राहिला आहे.मात्र सदर जमीन १९८० पुर्वी निर्वनीकरण झाल्याने अधिग्रहणाचा प्रश्न महसूल विभागाशी अधिक निगडीत आहे.एकूणच धुळे शहराच्या औद्योगिक विकासासाठी जमीन अधिग्रहणाचा मुद्दा निकाली निघणे गरजेचे आहे.या सर्व पार्श्वभूमीवर दि.२ जुलैची बैठक महत्वपूर्ण होती.याबैठकीत ना.उदय सामंत यांनी एम.आय.डी.सी.च्या वरिष्ठ अधिका-यांना स्पष्ट निर्देश कि जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव तत्काळ तयार करून महसूल विभागाकडे सादर करण्यात यावा असे आदेश संबंधित अधिका-यांना दिले तसेच प्रस्ताव सादर केल्यानंतर महसूल मंत्री यांचेकडून तातडीने मंजुरी मिळविण्यासाठी आ.शाह आणि मी व्यक्तीशः प्रयत्न करून मान्यता आणू अशी ग्वाही दिली.आ. फारुख शाह यांच्या मागणी वरून ना.उदय सामंत उद्योग मंत्री यांच्या दालनात संपन्न झालेल्या या बैठकीस आ.फारुख शाह यांच्यासह देगावकर साहेब सहसचिव उद्योग विभाग,डॉ.बिपीन शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी एम.आय.डी.सी.,सोनाली मुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.आय.डी.सी,राजेंद्र गावडे मुख्य अभियंता एम.आय.डी.सी,बाळासाहेब झंजे अधिक्षक अभियंता एम.आय.डी.सी,नितीन पाटील प्रादेशिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता धुळे एम.आय.डी.सी आदी उपस्थित होते.


Social Plugin