लोकसभा विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांनी लोकसभेच्या चर्चासत्रात हिंदू धर्मीय हिंसक कारवाया करतात असे विधान जाणीवपूर्वक करीत सनातन धर्मीयांना दुखावले आहे.
या घटनेमुळे भारतात सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असून त्याचे तीव्र पडसाद उमटत आहे.त्याचाच परिपाक म्हणून आज धुळे महानगर भाजपाच्या वतीने झाशी राणी चौकात राहुल गांधीच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा माजी खा.डॉ सुभाष भामरे व माजी आमदार आ. राजवर्धन कदमबांडे यांच्या मार्गदर्शनाने भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात घोषणा देत राहुल गांधी यांच्या प्रथमेश जोडे मारण्यात आले.राहुल गांधी मुर्दाबाद सनातन हिंदु धर्मीयांच्या विषय अपमान कारक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधीचा धिक्कार असो, भारत माता की जय ,जय श्रीराम,जय पवनसुत हनुमान की जय अशा घोषणांनी झाशी राणी चौक दणाणून गेला होता. या प्रसंगी महानगर प्रमुख गजेंद्र अंपळकर , माजी महापौर चंद्रकांत सोनार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, सोशल मीडिया प्रमुख पवन जाजु,प्रकाश उबाळे, अनिल थोरात, नरेंद्र हिरे,मयूर गवळी, कालिदास पोद्दार, अनिल सोनार, राजेंद्र मुजगे, सौ.आरती पवार,सौ.वंदना सातपुते , अमोल मासुळे,सौ. रंजना पाटील, विलास पाटील, कमलाकर पाटील,प्रकाश पाटील, गोपाल चौधरी, संजय सरग, हिरालाल मोरे, अरुण पवार, अजय अग्रवाल, सुरत चौधरी, हर्षल बोरसे आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.


Social Plugin