धुळे - सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे लेखाशीर्ष 50 54 /४ मार्ग व पूल अंतर्गत धुळे वडजाई सौंदाणे बाबुळवाडी रस्ता रुंदीकरण डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वडजाई रोड व्हावा म्हणून सौंदाणे बाबुळवाडी वडजाई व धुळे शहरातील नागरिकांची मागणी होती या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झालेली होती यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणे साचत होते या रस्त्यावर बाबुळवाडी सौंदाणे वडजाई गावातील व शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात रहदारी असून गावातील लोक शहरात येताना फार त्रास सहन करावा लागत होता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे अनेक समस्यांच्या सामना या भागातील नागरिकांना करावा लागत होता यासाठी नागरिकांनी आ.फारुख शाह यांच्याकडे हा रस्ता व्हावा म्हणून पाठपुरावा केलेला होता त्याची त्वरित दखल घेत आ.फारुख शाह यांनी वडजाई सौंदाणे बाबुळवाडी ते धुळे शहर पर्यंत हा रस्ता मंजूर करून आणलेला होता व त्याचे शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आले यावेळी आ.फारुख शाह यांचे सोबत डॉ. दिपश्री नाईक,अनिस शाह,डॉ.शराफत अली,प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह,डॉ.बापुराव पवार,इब्राहीम पठाण, हारुण खाटीक,आसिफ शाह, गफ्फार शेख,रियाज शाह,हलीम शमसुद्दिन, सउद आलम,इद्रिस शेख,माजीद मिर्झा,रिझवान शाह, नजर पठाण,सलमान खान,हाशिम अन्सारी सा.बांधकाम विभाग उप अभियंता धर्मेंद्र झाल्टे, कनिष्ठ अभियंता विकास लोकरे,कामाचे ठेकेदार बी.एस.पाटील,समीर शाह व या भागातील परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित होते तसेच एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते


Social Plugin