एस आर पी पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंतच्या कामामुळे साक्रिरोड चा चेहरा मोहरा बदलणार -आ.फारुख शाह

 





धुळे - धुळे शहरातील चारहीबाजूचे शहरात प्रवेश करणारे रस्ते आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाले असून आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नाने सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अंतर्गत एस आर पी पेट्रोल पंप ते सुरत बायपास पर्यंतच्या ५.४५ कोटी रुपये  खर्चाच्या कामाचे शुभारंभ आमदार फारुक शाह यांचे हस्ते करण्यात आले. धुळे शहरातील कॉलनी भाग तसेच शहरातील संपूर्ण रस्त्याचे कामाचे नियोजन एका ब्ल्यू प्रिंट द्वारे तयार करून शहरातील प्रवेशद्वार असलेले पारोळा रोड चौफुली ते प्रकाश टॉकीज तसेच चाळीसगाव चौफुली पासून ते श्रीराम पेट्रोल पंप तसेच गुरुद्वार पासून ते संतोषी माता पर्यंतचे रस्त्यांसाठी व शहरातील कॉलनी भागातील रस्त्यांसाठी आजपर्यंत आमदार फारुक शहा यांनी करोडो रुपयांच्या निधी आणून या रस्त्यांचे काम मार्गी लावलेले आहे. आ.फारुख शाह यांनी धुळे शहर हद्दीतील साक्री रोड साठी  सुमारे २० कोटीचा निधी मंजूर केला होता.त्यात मनपा ते विद्यावर्धिनी महाविद्यालय पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण पूर्णत्वास आलेले आहे.त्याच्यात एक भाग म्हणून आज पाच करोड ४५ लाख रुपये खर्चाचा कामाचा एस आर पी पेट्रोल पंप पासून ते सुरत बायपास पर्यंतच्या रस्त्याचे कामाचे शुभारंभ आमदार फारुक शहा यांच्या हस्ते करण्यात आले धुळे शहराला एक दूरदृष्टी असलेल्या आमदारांमुळे शहरातील मूलभूत सुविधा साठी विशेष प्रयत्न करून आजपर्यंत शहराचा विकास करण्यात आलेला आहे शहरातील प्रमुख समस्या असलेल्या रस्ते पाणी गटरी याव्यतिरिक्त धुळे शहरातील घरपट्टी रद्द करून आमदार फारुक शहा यांनी एक अभूतपूर्व काम केलेले आहे आज या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आ.फारुख शाह यांचे सोबत मिलिंद बैसाणे,डॉ.दीपश्री नाईक,डॉ.बापुराव पवार,प्यारेलाल पिंजारी,बाबुराव नेरकर,इकबाल शाह,डॉ.शराफत अली,बाळासाहेब सिसोदे,तुळशीराम पाटील,हाशिम अन्सारी,अनिस शाह,फकिरा बागवान,रियाज शाह,आसिफ शाह  व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे,कनिष्ठ अभियंता विकास लोकरे आणि या भागातील नागरिक तसेच कार्यकर्ते नगरसेवक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते