अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन.

 



 धुळे -साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील फाशीपुल चौकातील लेनीन चौकात असलेल्या अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.




लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यास अभिवादन करतांना शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉ.सुशील महाजन, बंडू गांगुर्डे, वाल्मीक अण्णा जाधव, देविदास कटरे, देविदास वाघ,गुलाब पटाईत, वाल्मीक जाधव,कॉम्रेड वसंत पाटील, कॉ. एल .आर.राव, सुरेश गायकवाड , यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन केले.