धुळे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक सहा शिक्षक कॉलनी साक्री रोड येथे रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या ५० लाख रुपये कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या भागातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की शिक्षक कॉलनी हे आजी माजी शिक्षकांची कॉलनी असून सुमारे ४० वर्षापासून या कॉलनीचे रस्ते अत्यंत खराब होते परंतु एक सुद्धा लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष दिले नाही आज साक्री रोड व मोगलाई परिसरात आमदार फारुक शाह यांनी या भागातील विकासासाठी सुमारे ५० कोटी रुपये पर्यंतच्या कामाचे शुभारंभ केले आहे व पूर्ण झालेले आहे यापूर्वी लोकप्रतिनिधींना याची जाण नव्हती का असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला. आज साक्री रोड विद्यावर्धिनी परिसरातील व मोगलाई भागातील अनेक कॉलनीमध्ये आ.फारुख शाह यांच्या निधीतून शेकडो कोटी रुपये कामाचे काम झालेले आहे दुसऱ्या लोकप्रतिनिधींनी फक्त मोठमोठ्या घोषणा केल्या परंतु साक्री रोड परिसरातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले व फक्त निवडणुकीच्या वेळेस आपले दर्शन दिले परंतु आ.फारुख शाह यांनी या सर्व समस्यांकडे लक्ष देऊन आज साक्री रोड सारखा दुर्लक्षित भागात अनेक रस्ते गटारी व मूलभूत सुख सुविधांसाठीच्या निधीमधून व सामाजिक न्याय च्या निधीतून अनेक काम मार्गी लावले यावेळी आ.फारुख शाह यांनी सांगितले की धुळे शहरातील मूलभूत विकासासाठी जेव्हा मी निवडून आलो तेव्हाच आम्ही ब्लू प्रिंट तयार करून ठेवली होती व त्या हिशोबाने आम्ही संपूर्ण शहराच्या दुर्लक्षित भागाकडे लक्ष देऊन त्या भागातील मूलभूत सुविधांसाठी आपली प्रयत्न केले व शासनाकडून निधी आणून या भागाच्या विकास केलेला आहे.आणखीन शहराच्या विकासासाठी अनेक काम शिल्लक असून त्यासाठी शहरातील नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला अपेक्षा आहे की शहरातील नागरिक काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना निवडून देतील अशी अपेक्षा आमदार फारुक शाह यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाच्या वेळीस शिक्षक कॉलनी,बुद्धभूषण कॉलनी,जवाहर कॉलनी,अनमोल कॉलनी,सिंचन कॉलनी, व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.आ.फारुख शाह यांचे सोबत डॉ.दीपश्री नाईक,मलेका खाटीक,डॉ.डी.एम.आखाडे,नितीन गायकवाड ,योगेश ईसी,रवी,नगराळे,आसिफ पोपट शाह,डॉ.घनश्याम थोरात,चिंतामण पाटील उदय पाटील संतोष शिंदे प्रशांत जैन राजेंद्र पवार सुनील लोंढे,राकेश गावित,जितेंद्र थोरात,स्वाती पवार,सरला पाटील,वृषाली पाटील,हिराबाई पाटील,आशाबाई पावरा,संघर्ष भामरे,डॉ.बापुराव पवार,जितेंद्र पवार,तुषार भामरे,हारून खाटीक मुजाहिद शेख समिर शाह,इलियास अन्सारी सर,रईस शाह,समीर मिर्झा,दिलीप पवार,गोलू शाह आदी उपस्थितीत होते.


Social Plugin