संत रविदास समाजभवन सोबत शहरात होणार आणखी एक बुद्ध विहार.सामाजिक न्याय विभागाकडून ५ कोटीच्या कामांना मंजुरी-आ.फारुख शाह

 





धुळे - महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अंतर्गत धुळे शहर मतदार संघासाठी आ.फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नातून  पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीतून देवपूरात संत रविदास सामाजिक भवन व व्यायामशाळा स्टेशन रोड गुरुकृपा नगर येथे संत रविदास समाज भवन आणि नकाने रोड येथे बुद्ध विहाराचे काम केले जाणार आहे.तसेच शहरातील सर्व अनुसूचित जाती तथा नव बौद्ध वसाहतींमध्ये हाय मास्ट लॅम्प बसविण्यात येणार असल्याचे आ.फारुख शाह यांनी कळविले आहे.

              धुळे शहराच्या विकासाची चौफेर उधळण होत असतांना शहरातील काही घटक आतापर्यंत विकासापासून वंचित राहिले होते.किंबहुना अनेक वर्षांपासून मागणी करून देखील अशा समाज घटकांना न्याय  मिळत नव्हता ही बाब लक्षात घेवून आ.फारुख शाह यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अंतर्गत ५ कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे.यात समाविष्ट कामे पुढीलप्रमाणे प्रभाग क्र. १५कृषी नगर देवराम जगताप ते जवराळ येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे.२५ लक्ष ,प्रभाग क्र. १५ जलसिंचन कॉलनीतील शामराव आल्हाट यांच्या घरापासून गजानन बन्सीलाल येळवे ते बी. डी. सूर्यवंशी यांच्या घरा पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे.२५ लक्ष ,प्रभाग क्र. १६ अजिंठा नगर येथे अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण करणे.२५ लक्ष ,प्रभाग क्र. ६ संबोधी नगर येथे सुरत बायपास ते राहुल साळवे यांचे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.२५ लक्ष ,प्रभाग क्र. १५ गोदाई कॉलनी पानपाटील यांच्या घरापासून खैरनार सर यांच्या घरा पर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे२५ लक्ष,प्र. क्र. १५ येथे समर्थ नगर मध्ये निकुंभ यांचे घरापासून ते भामरे यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे.२५ लक्ष ,प्रभाग क्र.४ संत रविदास गार्डन येथेअभ्यासिका व व्यायाम शाळा बांधणे.५० लक्ष,प्रभाग क्र.१ माजी सैनिक कॉलनी येथे पथदिवे व हायमास्ट वसविणे ५ लक्ष,प्रभाग क्र.०५नकाने रोड देवपूर येथे विपश्यना केंद्र बांधणे  .२५ लक्ष ,प्रभाग क्र. १५ देवचंद नगर संघामचौक ते दिपक गुलाले ते मकरध्वज मेश्राम पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे २५ लक्ष ,सुशील नगर गोळीबार टेकडी  परिसरात काँक्रीट गटार करणे.२५ लक्ष ,प्रभाग क्र.४ संत रविदास गार्डन, सिद्धार्थ कॉलनी, चंदन नगर, जागृती चौक, अण्णाभाऊ साठे चौक, रमाबाई आंबेडकर नगर येथे हायमास्ट बसविणे.२५ लक्ष ,निळा चौक, दादासाहेब गायकवाड चौक जुने धुळे येथे हायमास्ट बसविणे.५ लक्ष,डॉ. आंबेडकर चौक मनोहर थीयटरमागे, चंद्रमणी चौक येथे हायमास्ट बसविणे.५ लक्ष,म.फुले नगर, सिद्धार्थ नगर, रमापती चौक मोगलाई, मिलिंद सोसायटी येथे हायमास्ट बसविणे१० लक्ष,देवचंदनगर, जलगंगा, कृषी नगर, करुणाविहार, जोरावरअली, कुणाल सोसा, बुद्धभुषण सोसा, लुंबिनीवन परिसर, संबोधि नगर, येथे हायमास्ट बसविणे२५ लक्ष ,दक्षता सोसायटी संगमा चौक अनिता साळवे यांच्या घरासमोरील रस्ता कॉक्रीटीकरण करणे.२५ लक्ष ,प्र.क्र. १६ कृषी नगर वाघ सर यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. २५ लक्ष ,प्रभाग क्र. १७ गुरुकृपा नगर चितोड रोड येथे सभागृह  बांधणे.२५ लक्ष ,प्रभाग क्र. १६ कृषिनगर म्हसोबा मंदिर ते नानासाहेब देवरे यांचे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.२५ लक्ष ,प्रभाग क्र. १६ वसुंधरा नगर शेख धोबी यांच्या घरापासून ते कासार सरांचे घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे२५ लक्ष ,प्रभाग क्र. १६ कृषी नगर डी.पी.रोड ते प्रभाकर खंडारे   घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.२५ लक्ष इत्यादी कामांचा समावेश असून या कामांची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून लवकरच कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे आ.फारुख शाह यांनी कळविले आहे.