जळगाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले आठवले गटाच्या युवा जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की,
रिपाई आठवले गटाची महत्त्वाची बैठक शहरातील पद्मालय शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशान्वये पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रमेश जी मकासरे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष पदी भगवान सोनवणे यांची तर मिलिंद सोनवणे यांची युवा जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी पक्षाचे खानदेश विभागीय अध्यक्ष लक्ष्मण जाधव. उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदाम सोनवणे. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश मकासरे,लक्ष्मण जाधव,सुदाम सोनवणे,आनंद खरात, अनिल अडकमोल जामनेर तालुका अध्यक्ष रत्नाकर जोहरे ,अण्णा साहेब खेडकर, आदी उपस्थित होते.
मिलिंद सोनवणे हे नेहमी जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारीं आंदोलन करून नागरिकांच्या समस्या सोडवित असतात. जळगाव शहरात आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहें. सोनवणे हे करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना युवा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे.
या निवडीबद्दल पश्चिम जळगाव जिल्हा अध्यक्ष आनंद जी खरात, जिल्हा अध्यक्ष भगवान सोनवणे, यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे, अरुण गजरे, रावेर तालुका अध्यक्ष विकी तायडे, बोदवड तालुका अध्यक्ष समाधान वाघ मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष बोदडे अमळनेर तालुका अध्यक्ष यशवंत बैसाणे, शाम संदाशिव, पारोळा तालुका अध्यक्ष अशोक कापडने,एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर, भडगाव तालुका अध्यक्ष अण्णा खेडकर, पाचोरा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, जिल्हा सचिव भरत मोरे, जामनेर तालुका अध्यक्ष रत्नाकर जोहरे, शहराध्यक्ष पाचोरा भैया बागवान, महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जळगाव उपाध्यक्ष यशवंत घोडेस्वार, अक्षय मेघे, किरण गव्हाणे, अविनाश पारधे, मुकेश सपकाळे,पंकज सोनवणे, प्रवीण वाघ, दिनेश सोये, गोलू सोनवणे, कुणाल भावसार यांनी सोनवणे यांचे अभिनंदन केले आहे.


Social Plugin