ना. गिरीष महाजन, महामंत्री विजयभाऊ चौधरी, यांच्या शुभ हस्ते प्रतिभाताई चौधरीनी मंजूर केलेल्या विकासकामांचा शुभारंभ.






धुळे मनपा हद्दीतील विशेषता देवपूर भागातील विकास कामांचा अनुशेष भरण्यासाठी मूलभूत सोई सुविधा योजनेअंतर्गत मा. महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी यांनी रू १० कोटीचा भरीव निधी मंजूर करून आणला होता. सदर निधीतून विविध विकास कामे करण्यात येणार असून यामुळे निश्चितच धुळे शहराच्या सौंदर्यात आणि विकासात भर पडणार आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे,पालकमंत्री गिरीश महाजन,महामंत्री विजय चौधरी, यांच्यासह सर्वच नेते मंडळी यांचे अनमोल सहकार्य लाभले होते.त्याचाच एक भाग म्हणून  अश्या भव्य विकास कामांचा आज शुभारंभ करण्यात आला. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहरातील विविध विकास कामे आकारास येत आहेत. तसेच देवपूर प्रभागातील विकास कामांचा प्रलंबित अनुशेष लक्षात घेतात पालकमंत्री यांचे शासन स्तरावरून केलेले सहकार्य अतिशय महत्त्वपूर्ण आहे . आज दिनांक १५ ऑगस्ट २०२४ वार गुरुवार रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन इंदिरा उद्यान आनंद नगर येथे सकाळी ११.३० सदर भव्य विकास कामांचा शुभारंभचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मा.महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी यांनी सांगितले की, धुळे शहरातील देवपूरातील प्रभाग क्र ४ मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज    चौक इंदिरा उद्यान चौक  यापूर्वी सन २०११ मध्ये मी प्रभाग क्र १५ ची नगरसेविका असताना विकसित केला होता . त्यावेळी उद्यानाची भिंत मागे सरकवून  आज दिसत असलेला ८० फुटाचा मोठा  रस्ता करण्यात आला होता .सदर कामास तत्कालीन खा.डॉ.सुभाष भामरे यांनी रू  १५ लक्ष निधी उपलब्ध करून दिला होता. आता ही सदर भागात सध्या असलेली उद्यानाची भिंत ही नव्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याप्रमाणे तयार केली जाणार आहे .तसेच प्रमुख रस्त्यावर पाण्याच्या कारंजा बसविणे, लाईट दुभाजक इत्यादी कामे होणार आहेत तसेच नुकतेच इंदिरा उद्यान येथे रू २० लक्षचे राजमाता जिजाऊ सभा मंडपाचे काम ही माझ्या स्थानिक निधीतून पूर्ण करण्यात येत आहे. तसेच इंदिरा उद्यान परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, खाजगी कोचिंग क्लासेस असल्याने येथे चौकात कायम वर्दळ असते. वाहतुकीची अडचण निर्माण होत असते. तसेच या ठिकाणी टवाळखोर मुले सदर परिसरात फिरत असतात तसेच अनेक वेळा महिलांचे सौभाग्याचे लेणं म्हणजे मंगळसूत्र सुद्धा चेनसाखळी चोर यांनी  लुटून नेले आहे. तसेच मध्यतरी  काही अनधिकृत बोगस कॅफे ही सुरू झाले होते. यामुळे सदर परिसरात एक कायम स्वरुपी पोलीस चौकी असावी अशी मागणी मा.महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्याकडे केली होती.त्यामुळे सदर भागात एक अद्यावत पोलीस चौकी ही उभारण्यात येणार आहे .तसेच सदर भागातील मुलांसाठी एक अद्यावत अभ्यासिका आणि जेष्ठ नागरिक  यांच्यासाठी एक सभागृह ही बांधले जाणार आहे .वरील कामे मंजूर करण्यासाठी मला फार पाठपुरावा करावा लागला. मुंबईत मंत्रालय तसेच धुळ्यात विविध शासकीय कार्यालय येथे प्रयत्न करावे लागले.त्यानंतर सदर निधी मिळवून आज प्रत्यक्षात विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री गिरीष भाऊ महाजन आणि महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केला जात आहे याचा मनापासून फार आनंद होत आहे.


यावेळी सदर भागातील नागरिकांनी विविध विकास कामे मंजूर केल्याबद्दल मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांचा जाहीर सत्कार करून आभार मानले

यावेळी सदर कार्यक्रमास  प्रमुख मान्यवर पालकमंत्री गिरीष भाऊ  महाजन,भाजपा प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी,मा खा डॉ सुभाष भामरे,मा.आ.राजवर्धन कदमबांडे,मनपा प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी,विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल,मा महापौर चंद्रकांत सोनार,मा महापौर जयश्री अहिरराव,प्रदेश सदस्या डॉ माधुरी बाफना,ओबीसी सायोजीका मायादेवी परदेशी,मा स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, मा शहर अभियंता कैलास शिंदे,नगरसचिव मनोज वाघ,मराठा सेवा संघ जेष्ठ पदाधिकारी साहेबराव देसाई,इंजी प्रदीप चव्हाण रावसाहेब,इंजी वर्षा पाटील,आझाद नगर मंडळ अध्यक्ष बबनराव चौधरी,देवपूर मंडल अध्यक्ष अरुण पवार,सौ रंजना पाटील,गिरीष मराठे,कृपेश नांद्रे,प्रा उदय तोरवणे,प्रा बिपीन सोनवणे,सुमित बोरसे,हरिष चौधरी,सुधीर बोरसे,भारत वाघ,सचिन दहिते,भटू अप्पा चौधरी,प्रवीण बोरसे,शेखर कुलकर्णी,महेंद्र बेहरे रावसाहेब,पवन खानकरी,योगेश मोराणकर,शरद नाना चौधरी,संजय ठाकूर,भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रा सागर चौधरी,प्रा मनोज पाटील,वैभव सयाजी,योगेश चौधरी,विकास चौधरी,केतन पाटील,किशन चौधरी यांच्यासह प्रभागातील विविध नागरिक बंधू भगिनी मान्यवर उपस्थितीत होते.