धुळे - माजी खा.सुभाष भामरे,माजी महापौर प्रदीप कर्पे यांचे बेकायदेशीर बांधकाम तोडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी जिल्हा एम.आय.एम. पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिके समोर आंदोलन करण्यात येवून आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदन देण्यात आले व तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
आयुक्त अमिता दगडे पाटील याना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय पुढीलप्रमाणे धुळे शहरात मोठ्या प्रमाणात वक्फ संस्थेच्या जमिनी आहेत.ब्रिटीश काळापासून सेक्रेटरी ऑफ स्टेट इन कॉन्सील जिल्हा खानदेश यांनी जवळ जवळ ७५ एकर जमीन मस्जिद,दर्गाः,कब्रस्थान यांची खिदमत करण्यासाठी सेवेकरी म्हणून अबू अहमद यार महंमद मौलवी यांना दिली होती.कालांतराने या मालमत्ता वक्फ मंडळाकडे वर्ग झाल्या. ८० फुटी रोड वरील माजी खा.सुभाष भामरे यांचे घर व दवाखाना ,नटराज थीयटर ला लागून फा.प्लॉट.क्र.५० वरील माजी महापौर प्रदीप कर्पे यांचे घर व इतर यांचे घर वक्फ बोर्डाच्या जागेवर आहे.या संदर्भात त्यांना वक्फ बोर्डाने बेकायदेशीर ताबा आणि बांधकाम हटविणे बाबत नोटीस देखील दिलेली आहे.त्यामुळे वक्फ मंडळाच्या जागा हडपणारे माजी खा.सुभाष भामरे,माजी महापौर प्रदीप कर्पे यांचे बेकायदेशीर बांधकाम तोडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. जिल्हा एम.आय.एम. पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिके समोर करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नासीर पठाण,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ.दीपश्री नाईक,शहराध्यक्षा फातेमा अन्सारी,युवक जिल्हाध्यक्ष रफिक पठाण,माजी नगरसेवक सइदबेग,इक्बाल शाह,जाहिद अन्सारी,सुफी हाजी कुरेशी,अजहर सैय्यद,कैसर अहमद,हालीम शमशुद्दीन,डॉ.शराफत अली,आसिफ शाह,हारूण खाटिक,फुझेल आझमी,शहजाद मन्सुरी,इद्रीस गनी शेख,नझर पठाण,वसिम पिंजारी, सउद आलम, मुजाहिद शेख,अकिब अली,सलमान खान,समीर मिर्झा,फैझल अन्सारी,फैसल अहमद, ,जुबेर शाह,कौसर शाह,समीर अन्सारी,कादिर अन्सारी,सलमान अन्सारी,गोलू शाह,अफसर शाह इंजि.,जुबेर शेख,हाशिम अन्सारी,मलेका खाटिक,शाहेदा अन्सारी,अकीला सैय्यद,परवीन शेख,रिझवाना शेख ,आदी सहभागी झाले होते.


Social Plugin