मला कार्यसम्राट म्हणू नका,मी जनतेचा विकास करणारा सामान्य कार्यकर्ता -आ.फारुख शाह





धुळे - धुळे शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या ८० फुटी रोड  पांडव प्लाझा ते  स्टेशन रोड पर्यंतच्या कामाचे लोकार्पण आ.फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले धुळे शहरातील हा प्रमुख रस्ता असून या रस्त्याचे काम यापूर्वी सुमारे २४ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. पूर्ण खराब झालेला  हा रस्ता शहरातील प्रमुख वस्ती व स्टेशन रोडला जोडणारा असून मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर वर्दळ असते या भागातील नागरिकांनी व व्यापारांनी हा रस्ता व्हावा म्हणून आ.फारुख शाह  यांच्याकडे मागणी केली होती या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत आ.फारुख शाह  यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला होता व आज हा रस्ता पांडव प्लाझा ते स्टेशन रोड पर्यंत तयार झालेला असून त्याचे लोकार्पण आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या भागातील व्यापारी आणि नागरिकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की ८० फुटी रस्त्यावर व या रस्त्यालगत धुळे शहराचे राजकारण करणारा मोठा नेता राहतो परंतु त्यांनी सुद्धा या रस्त्यावर लक्ष दिले नाही म्हणून आम्ही आ.फारुख शाह यांच्याकडे या रस्त्यासाठी मागणी केली होतीआम्हाला या रस्त्याबाबत शंका होती त्या रस्ता होणार की नाही परंतु आ.फारुख शाह  यांनी तात्काळ त्याची दखल घेत तीन महिन्याच्या कालावधीत हा रस्ता तयार करून आम्हाला एक सुखद धक्का दिलेला आहे आम्हाला यापुढे सुद्धा असंच कर्तव्यदक्ष आमदार म्हणून धुळे शहराला पाहिजे आहे व पुढच्या वेळेस सुद्धा आम्ही आ.फारुख शाह यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केली या कार्यक्रमाच्या वेळी आ.फारुख शाह यांचे सोबत कैलास हजारे,व्ही.एस.अग्रवाल CA,डॉ.दीपश्री नाईक,प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह,डॉ. शराफत अली,अनिस शाह,फुझेल आझमी,निजाम सैय्यद, गफ्फार शाह, डॉ.बापुराव पवार, घनश्याम शेठ गिंदोडिया,  नितीन खरात, पांडुरंग थोरात ,विलास हजारे, दीपक सोनार, दिनेश आटोळे प्रफुल पाटील ,सुधाकर पाटील, राहुल पाटील, सुधीर इथापे, आसिफ पोपट शाह,इमरान पिंजारी ,इरफान शेख ,संजय शर्मा कुनाल खैरनार ,पंकज शाह,रितेश जावळे,भावेश शाह,नाना जाधव,मदनलाल अग्रवाल, रईस शाह,गोलू शाह, कौसर शाह,मुजाहीद शेख,व या भागातील नागरिक व्यापारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.