जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांची धुळ्यात निदर्शने






शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी.पवित्र पोर्टलवरील शिक्षक नियुक्ती तत्काळ करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी परवानगी द्यावी यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी आज शिक्षकांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. निवेदनात म्हटले की, १५ मार्च २०२४ चा सेवक संच शासन निर्णयात  दुरुस्ती करावी प्राथमिक , माध्यमिक  व उच्च  माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून शंभर टक्के अनुदान जाहीर करावे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता मिळाव्यात , चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक   न करता पूर्वी प्रमाणेच वेतनावर नेमणूक व्हावी, अल्पभाषिक व अल्पसंख्यांक शाळेतील प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक  विभागातील रिक्त पदांची शंभर टक्के शिक्षक भरती करण्याची परवानगी मिळाली . शाळेमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यास परवानगी मिळाली.शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना  अमलात आणावी.२००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना मंजूर करावी मूल्यांकनास  पात्र ठरलेल्या सर्वच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या मान्यता वर्षाचा विचार करून शंभर टक्के अनुदान मिळावे. अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांना अनुदान जाहीर करावे . सेवा हमी कायद्यानुसार शिक्षण विभागातील विविध स्तरावर क्षेत्रीय कार्यालयामध्येही कामकाज व्हावे, आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.या आंदोलनात धुळे जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेचे शरद पाटील,जिल्हा माध्य . व उच्च माध्य शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आर.व्ही .पाटील,उदय तोरवणे,जिल्हा माध्य .शिक्षक  संघटनेचे व्ही. टी. गवळे ,जिल्हा टीडीएफ संघाचे संजय पवार ,जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे देवानंद ठाकूर, रवींद्र वाणी, जिल्हा शिक्षक परिषद  संघटनेचे महेश मुळे, नितीन ठाकूर, भरतसिंग भदोरिया,जिल्हा शिक्षक भारतीचे   अशपाक खाटीक, खेमचंद पाकळे,कैलास अमृतकर,जिल्हा उर्दू  शिक्षक संघटनेचे लतीफ देशमुख,जिल्हा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे राजेश पाटील, महेंद्र बच्छाव, आदीसह शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.