अनुष्का सेवाभावी संस्थेच्या वतीने आज 4 ऑगस्ट रोजी समतानगर परिसरातील, पठाण बाबा टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की अनुष्का सेवाभावी संस्थेतर्फे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, उपक्रम राबविले जातं असतात. यात आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम, वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमांचा समावेश असतो. अनुष्का सेवाभावी संस्थेचा यावर्षी 1000 झाडे लावण्याचा मानस असून, संस्थेतर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविले जात आहे. ग्लोबल वार्मिंग चा विचार करता जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याने, आज जळगाव शहरातील समता नगर परिसरातील, पठाण बाबा टेकडी येथे विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन वृक्ष लागवड केली.
यावेळी वड, कडू निंब, पिंपळ आदी वृक्षांच्या रोपाची लागवड करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, बहुजन क्रांती मोर्चाचे सुमित्र अहिरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदजी इंगळे, भारत मुक्ती मोर्चाचे महासचिव,मोहन शिंदे बहुजन कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव बी.एस. व्हडगर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कवाडे गट कल्पेश मोरे, अनुष्का सेवाभावी संस्थेच्या सचिव वैशाली व्हडगर रिपब्लिकन पार्टी कामगार आघाडीचे भीमराव सोनवणे, चित्रपट कलावंत सुनीलजी भटकर, विकी भाऊ बागुल, ऍड. कबीर म्हसदे, युनूस पठाण, अविनाश तायडे आदी उपस्थित होते.



Social Plugin