आश्रम शाळेतील 27 विद्यार्थिनींना विषबाधा, रात्रीच्या जेवणानंतर मळमळ, उलट्यांचा त्रास सुरु

 







पालघरमधील आश्रम शाळेतील 27 विद्यार्थिनींना पहाटेच्या नाश्तानंतर विषबाधा झाल्याचे समोर आलं. सेंट्रल किचनमधील विषारी भाजी खाल्ल्याने रणकोळ, आंबेसरी, खंबाळे या तीन आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.



आश्रम शाळेतील 27 विद्यार्थिनींना विषबाधा, रात्रीच्या जेवणानंतर मळमळ, उलट्यांचा त्रास सुरु

आश्रम शाळेतील 27 विद्यार्थिनींना विषबाधा, रात्रीच्या जेवणानंतर मळमळ, उलट्यांचा त्रास सुरु



अनेकदा राज्यातील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या आहारामध्ये किडे, मुंग्या, आळ्या आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. अशातच आता पालघरमधील एका आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. 27 विद्यार्थिनींना विषवाधा झाली त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.


डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत रणकोळ आश्रमशाळेतील 27 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल (5 ऑगस्ट) पहिला श्रावणी सोमवार होता. रात्री विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. त्यानंतर सर्वजण रणकोळ आश्रमशाळेतील रुमवर गेले. मात्र, मंगळवारी सकाळी आश्रमशाळेतील काही विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. त्यानंतर 27 विद्यार्थिनींना उलट्या होऊ लागल्या. यानंतर तातडीने सर्वांना जवळच्या कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना या विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


काही विद्यार्थिनींना रात्रीपासूनच अस्वस्थ जाणवत होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू केले होते. यापैकी आठ विद्यार्थिनींना उपचार सुरू असून विद्यार्थिनींना प्राथमिक उपचार करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दहा विद्यार्थिनींना आयना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती कासा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रदीप भोये यांनी दिली.


विद्यार्थिनींना विषबाधा कशामुळे झाली?



डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कांबळगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकघरातून अन्न पुरवठा केला जातो. हे केंद्रीय स्वयंपाकघर सरकार चालवते. सोमवारी रात्रीच्या जेवणात दुधी भोपाळची भाजी होती. या भाजीतूनच विष प्राशन करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रणकोळ, आंबेसरी, खंबाळे या आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना बाधा झाल्याची माहिती मिळत असून रणकोळ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ऐना आणि कासा येथील शासकीय रुग्णालयात तर खंबाळे येथील विद्यार्थ्यांना वाणगाव आणि आंबेसरील येथील विद्यार्थ्यांना गंजाड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत असून ह्या सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आला आहे.