सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम महोत्सवातून होत असते खासदार स्मिता वाघ यांचे प्रतिपादन

 


आमदार सांस्कृतिक महोत्सवाचा थाटात समारोप विजेत्यांना  पारितोषिक वितरण.




जळगावची सांस्कृतिक भूमी टिकून राहायला हवी सांस्कृतिक वारसा जोपासण्याचे काम बालपणापासून करण्याचे काम महोत्सव करत असते.  काळानुसार सर्व बदलते मामाचे काम हट्ट पुरवण्याचे असते. आणि आमदार राजू मामा हट्ट पुरवण्यास कधीही मागे पुढे पाहत नाही.  भविष्यात देखील आपण सर्वांनी आमदार राजुमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी केले. आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) आयोजित आपल्या जळगाव शहराचा सांस्कृतिक उस्तव आमदार सांस्कृतिक महोत्सव 2024 चा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा दिनांक २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घेण्यात आला.  प्रसंगी व्यासपीठावर खासदार स्मिता आमदार राजू मामा भोळे  हास्य जत्रा फेम कलाकार प्राध्यापक हेमंत पाटील माजी महापौर सीमाताई भोळे,  माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, जितेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकी पाटील, गायत्री राणे,  नीला चौधरी,  दीप्ती चिरमाडे,  माजी कृषी अधिकारी अनिल भोकरे,  आदींसह मान्यवर उपस्थित होते.  


प्रास्ताविक भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी यांनी केले.  कलाकार प्राध्यापक हेमंत पाटील म्हणाले सांस्कृतिक महोत्सव गरजेचे आहे.  आपल्यावर मायेच्या ममतेने राजू मामांनी प्रेम केले आहे.  मामांनी हा महोत्सव दरवर्षी घ्यावा अशी विनंती प्राध्यापक हेमंत पाटील यांनी केली.  आमदार भोळे यांनी लागलीच महोत्सव दरवर्षी घेण्यात येईल असे जाहीर केले. यावेळी प्राध्यापक पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा देत दरवर्षी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले . आमदार राजुमामा भोळे म्हणाले की,  सध्याच्या युगात गुणांची स्पर्धा लागली आहे पालकांनी विद्यार्थ्यांमधील गुण कला ओळखून त्यांना वाव द्यायला हवा.  नेहमी सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा स्पर्धेत विजय पराजय हा होत असतो मात्र स्पर्धेत भाग घेणे आवश्यक असते कारण एकाच्या सहभागाशिवाय दुसरा स्पर्धक विजयी होऊ शकत नाही.  असे आमदार भोळे  यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले.  यानंतर विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.  यावेळी मनोज भांडारकर, शैला चौधरी, ललित बडगुजर, अजित राणे , गजानन वंजारी, मिलिंद चौधरी, रेखा कुलकर्णी, विनोद मराठे उपस्थित होते.