मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामुळे ३५ हजार रुग्णांचे वाचले प्राण- राम राऊत

 






ना वशिला ना ओळख , इथे  मिळते थेट मदत असे ब्रीदवाक्य असलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष राज्यभरातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. गेल्या २ वर्षात २८५ कोटी निधीतून ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचले असल्याची माहिती राज्य प्रमुख राम राऊत , विस्तारक तथा  युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रथमेश गुलाबराव पाटील यांनी परिषदेत दिली.त्याच बरोबर रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले .यावेळी पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले,जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित,महानगरप्रमुख संजय गुजराथी,शेखर बडगुजर, उपस्थित होते.योजनेसाठी अप्लीकेशन वरून देखील नोंदणी करता येणार आहे.त्यामुळे वेळीची बचत होणार आहे शिवाय एका आठवड्याच्या आत सहायता निधीचा अर्ज निकाली काढला जात आहे . मुख्यमंत्री वैद्यकीय वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची देखील गरज नाही .रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक हे ऑनलाइन अर्ज  करू शकतात व त्या अर्जावर रुग्णांना मदत मिळते. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रकिया संपूर्णत: नि:शुल्क आहे. रुग्णांनी  किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करावा आणि मदत मिळवावी असे राऊत म्हणाले.यावेळी सतिष महाले यांनी सांगितले की मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे.या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरश: जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांशी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.