जळीत कुटुंबियांच्या मदतीला धावले रिपाईचे अनिल अडकमोल जैन उद्योग समुहाकडून मिळवून दिली मदत.

 





जळगाव शहरातील समतानगरातील धामणगाव वाडा येथील घराला शार्टसकीटमुळे आग लागल्याने संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या. यामुळे जळीत कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून रिपाई आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्याशी मदतीबाबत चर्चा केली होती. त्याअनुषंगाने जैन उद्योग समूहाकडून 12 सप्टेंबर 2024 रोजी दुर्गाबाई सदाशिव चव्हाण, किशोर सदाशिव चव्हाण, सावित्री किशोर चव्हाण, समीक्षा किशोर चव्हाण, रितिका किशोर चव्हाण, या पीडित कुटुंबियाना संसार उपयोगी देण्यात आल्या.  यावेळी रिपाई आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल जैन उद्योग समुहाचे व्हाईस मीडिया प्रेसिडेंट अनिल जोशी, रिपाई  महानगर उपाध्यक्ष  प्रताप बनसोडे,  किरण अडकमोल,  अनिल लोढे, गौतम सरदार, लताबाई कोळी, अंजनाबाई पाटील, जनाबाई चौधरी आदी उपस्थित होते.