आ.फारुख शाह यांच्या प्रयत्नाने सुरेंद्र डेअरी ते जे.के.ठाकरे चौक पर्यंत रस्ता कामाचा शुभारंभ.

 






धुळे - सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे मार्ग पूल अंतर्गत सुरेंद्र डेअरी ते जेके ठाकरे चौक पर्यंत रस्ता सुधारणा करणे या तीन करोड 65 लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांच्या शुभहस्ते करण्यात आले.साक्री रोड परिसरात व कॉलनी परिसरात पाच वर्षांपूर्वी रस्ते व मूलभूत सुविधाचा वाणवा होता. आ.फारुख शाह  यांच्या प्रयत्नाने साक्रीरोड परिसरात आज पर्यंत रस्ते गटारी पाईपलाईन वाल कंपाऊंड व मूलभूत सुविधांसाठी आ.फारुख शाह यांनी आज पर्यंत आणलेला आहे. धुळे शहरातील प्रमुख मार्ग असलेला साक्री रोड हा पूर्णपणे अतिक्रमणग्रस्त व नादुरुस्त अवस्थेत होता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व चालण्यासारखी परिस्थिती नव्हती शहरातील प्रमुख महामार्ग असलेला हा रस्ता दुर्लक्षित होता यासाठी या परिसरातील नागरिकांनी आ.फारुख शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की नेहरू पुतळ्यापासून ते सुरत बायपास चौक चौफुलीपर्यंत चहा रस्ता चांगल्या पद्धतीने व्हावा रहदारीला मोकळा व्हावा यासाठी निवेदन देण्यात आलेले होते यासाठी आ.फारुख शाह यांनी प्रयत्न करून नेहरू पुतळा पासून ते सुरत बायपास चौफुली पर्यंतच्या संपूर्ण रस्त्यासाठी करोडो रुपयांच्या निधी शासनाकडून उपलब्ध करून घेतला व आज हा रस्ता एक मॉडेल रस्ता तयार होत असून या रस्त्याच्या मध्यभागी लाईट पावसाच्या पाण्याच्या गटारीची निचऱ्याची व्यवस्था सुशोभीकरण आ.फारुख शाह  यांच्या प्रयत्नाने करण्यात आलेले आहे.शहरात अनेक लोकप्रतिनिधी आले परंतु शहराच्या रस्त्यांची हाल अपेष्टा काय संपुष्टात आलेली नव्हती परंतु आ.फारुख शाह यांनी शहरातील मूलभूत सुख सुविधांसाठी करोडो रुपयांच्या निधी आणून शहराच्या प्रमुख चारही महामार्गाच्या रस्त्यांचे काम आज पर्यंत केलेले असून यापुढे सुद्धा ही विकास गंगा अशीच वाहणार असून यासाठी आ.फारुख शाह  यांना येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शन मध्ये शहरातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा अशी भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे या कार्यक्रमाच्यावेळी 

आ.फारुख शाह यांचे सोबत योगेश ईशी,डॉ.दीपश्री नाईक, मलेका खाटीक,प्यारेलाल पिंजारी, राजू पिंजारी, निजाम सय्यद,डॉ.बापुराव पवार, अजमी कैसर अहमद, हारुण खाटीक, डॉ.शराफत अली फैसल अन्सारी, विशाल महाले ,लखन गोराड ,नंदाताई पाटील ,बंटी महाजन ,छोटू चौधरी ,अतुल शिंदे बबलू जगताप ,सलमान अन्सारी,समीर शाह व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते