संचेती हॉस्पिटल पुणे यांच्या मार्फत बाल अस्थिरोग शिबिराचे आयोजन.

 





संचेती डव्हान्स ऑर्था केअर हॉस्पिटल , पुणे यांच्या वतीने धुळे शहरात २९ सप्टेंबर रोजी मोफत लहान मुलांच्या हाडावरील तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे . याविषयी आयएमए सभागृहात २६ सप्टेंबर रोजी डॉ.दीपक दिनकर पाटील , डॉ. सुरेंद्र झेंडे,डॉ. संजय शिंदे,डॉ.तुषार कानडे,डॉ. यशवंत महाले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.२९ सप्टेंबर रोजी रविवार,सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.




सदर शिबिराचे उद्घाटन इंडियन मेडिकल असोसिएशन धुळे चे प्रमुख डॉ.रवी वानखेडकर यांच्या हस्ते होणार आहे.या शिबिरात लहान मुलांच्या विविध हाडांच्या आजारांवर जसे  सेरेब्रल पाल्सी , पोलिओ,पाय सपाट असणे, जन्मत: असलेली हाता पायाची अपंगतत्व, तिरकी मान , चालन्यातील दोष,लहान मुलांचे फ्रॅक्चर, चिकटलेले गुडघे, बेंड असलेले पाय इत्यादी रोगांवर पुण्याचे सुप्रसिद्ध संचेती हॉस्पिटलचे प्रसिद्ध बाल अस्थिरोग तज्ञ डॉ संदीप पटवर्धन व डॉ.विवेक सोढाई हे तपासणी करणार आहेत.ही संकल्पना महाराष्ट्रातील संचेती रुग्णालयात पुणे येथे मागील २० वर्षे पासून सुरू करण्यात आली असून ती अनोखी आहे . याचा फायदा रुग्णांनी करून घ्यावा असे आवाहन पत्रपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले त्याचबरोबर संचेती हॉस्पिटलची वैशिष्ट्ये आणि सुविधा यांच्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. उत्कृष्ट वैद्यकीय सेवा आणि शैक्षणिक सोई हे संचेती हॉस्पिटल चे वैशिष्ट्य आहे.

मानवी स्पर्शासह अद्यावत शोध हा डॉ.संचेती यांचा एक अद्वितीय गुण आहे. डॉ. पराग संचेती हे डॉ के एच संचेती यांनी सुरू केलेले महान मानवतावादी कार्य सुरू ठेवत आहेत असे प्रतिपादन डॉ.दीपक दिनकर पाटील यांनी केले. संचेती हॉस्पिटल हे पुण्यातील एक प्रसिद्ध ऑर्थपेडिक हॉस्पिटल आहे.

बाल अस्थिरोग विभाग हा लहान मुलांवरील  हाडांच्या रोगांवर काळजी प्रदान करतो ,लवकर निदान उपचार आणि पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करतो.विशेषत: सेरेब्रल प्लासी व्यवस्थापन पोलिओ आणि पोलिओ नंतरची परिस्थिती जन्मजातविकृती क्लब फूट, हात आणि पाय विकृती , बालरोग फ्रॅक्चर आणि आघात काळजी, पाठीचा कणाविकृती ( स्कोलियोसिस,किफोसिस),अंग   लांब करणे आणि पुनर्रचना, न्यूरोलॉजिकल विकारांशी संबंधित आर्थपेडिक परिस्थिती विभाग प्रमुख डॉ संदीप पटवर्धन  ( एमएस आर्था, बाल अस्थिरोग विशेषज्ञ) डॉ विवेक सोढाई ( बाल अस्थिरोग तज्ञ ) यांचे विशेष मार्गदर्शन असते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात मानवाला हाडांचे आजार सामान्य विषय बनला आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाने सेवाभाव ठेवला पाहिजे.यापुढेही  कार्यरत राहू असा मनोदय यावेळी सर्व डॉक्टरांनी बोलून दाखविला आहे .तसेच जास्तीत जास्त पालकांनी आपल्या हाडांशी सबंधित त्रस्त बालकांना या शिबिरात आणून तपासणी करावे असे आवाहन करण्यात आले.