धुळे - महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्र. क्र.१९ गट न.३१ येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे व प्ले ग्राउंड तयार करणे या ९० लक्ष खर्चाच्या कामाचे लोकार्पण आ.फारुख शाह यांचे शुभहस्ते संपन्न झाले.शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत.मात्र महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे सर्व खुल्या जागांवर अतिक्रमण करून कब्जा केला जात आहे.पर्यायाने नागरिकांच्या विविध अनुषंगिक गरजा भागाव्या हा शासनाचा उदात्त हेतू लाच हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. ही बाब लक्षात घेवून आ.फारुख शाह यांनी मोठ्याप्रमाणात खुल्या जागांना कुंपण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे त्याचाच एक भाग म्हणजे प्र. क्र.१९ गट न.३१ येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे हे काम आहे.
धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा चा विकासांतर्गत प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेस प्लेग्राउंड करून वॉल कंपाऊंड करणे या कामाचे लोकार्पण आ.फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले. धुळे शहरातील अनेक सार्वजनिक जागेवर अतिक्रमण होत होते त्याच्या संपूर्ण अभ्यास करून आ.फारुख शाह यांनी धुळे शहरातील अशा जागेवर वॉल कंपाऊंड करून त्या जागा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या व त्या जागेवर वॉल कंपाऊंड करून अतिक्रमण होण्यापासून रोखण्यात आले तसेच शहरातील महिलांसाठी एक सुद्धा गार्डन नसताना व खास करून मुस्लिम महिलांसाठी व मुलांसाठी धुळे शहरात एक सुद्धा गार्डन नव्हते त्याच्यासाठी प्रभाग क्रमांक 19 येथे गार्डन उपलब्ध करून दिले व शैक्षणिक नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासासाठी जागा शहरात उपलब्ध नव्हती त्यासाठी शहरात चार ठिकाणी अभ्यासिका बांधून पूर्ण करण्यात आलेले आहे व आज विद्यार्थी या अभ्यासिकांच्या उपयोग करीत आहेत तरुणांसाठी प्लेग्राउंड बनवून दिला तसेच धुळे शहरातील महानगरपालिका शाळा व शैक्षणिक विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी डिजिटल क्लासरूम आ.फारुख शाह यांनी धुळ्यात उपलब्ध करून दिलेले आहेत शहराच्या विकासासाठी मूलभूत सुविधा त्याचबरोबर सामाजिक काम करून एक आदर्श निर्माण करण्याचे काम आमदार फारुक आहे करत असून कार्य,कर्ता म्हणजेच आमदार हे नवीन संकल्पना आ.फारुख शाह यांनी धुळे शहरासाठी निर्माण केली असून शहराच्या एक कार्यकर्ता म्हणून आ.फारुख शाह काम करत असून एक दूरदृष्टी ठेवून धुळे शहराच्या संपूर्ण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करून करोडो रुपयांच्या निधी धुळे शहरासाठी आणलेला असून धुळे शहराच्या प्रशासकीय इमारत आरटीओ इमारत आदिवासी वस्तीगृह आयटीआयच्या बांधकामासाठी तसेच जुने सिविल रुग्णालय हिरे मेडिकल कॉलेज एमआयडीसीच्या पाणी प्रकल्प प्रशासकीय इमारत अशा अनेक विकासाचे कामे करून धुळे शहरात एक आदर्श कार्यकर्ता तथा आमदार म्हणून धुळे शहराचा विकास करणे हेच उद्देश ठेवून आ.फारुख शाह कार्य करीत असून यापुढे सुद्धा आ.फारुख शाह यांना येणाऱ्या निवडणुकीत पाठिंबा देऊन आपल्या सेवेसाठी निवडून आणण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन प्रभाग क्रमांक 19 येथील नागरिकांनी आपला भावना व्यक्त करताना सांगितले या कार्यक्रमाला आ.फारुख शाह यांचे सोबत डॉ.दीपश्री नाईक,आमिर पठाण,निजाम सैय्यद,मौलाना शकील,प्यारेलाल पिंजारी, अशपाक पिंजारी,अजिद पिंजारी, रफिक शेख,गफ्फार शेख,अनिस शाह,बोलू बाबा शाह,इकबाल शाह,डॉ. शराफत अली,कैसर अहमद,गुड्डू काझी,इम्रान शेख,शरीफ पठाण, डॉ.बापुराव पवार,अल्तमस शेख, यासिन मेमन,डॉ.मलिक ,अकबर पठाण ,अन्वर पठाण,शहजाद मन्सुरी,माजीद पठाण,मोहंमद अन्सारी, हारुण खाटीक,युसुफ शेख, सउद आलम,फैसल अन्सारी व कामाचे ठेकेदार इंजि.अफसर शाह आदी उपस्थित होते.


Social Plugin