शहरातील शैक्षणिक चौकात कमलाबाई शाळेजवळ रस्ता ओलांडताना होणारे विद्यार्थ्यांचे अपघात टाळण्यासाठी आ.फारुक शाह यांनी पादचारी पुल उभारला आहे.तशाच पुलाची निर्मिती जुन्या मुंबई -आग्रा महामार्गावर सुशी नाल्यानजीक असलेल्या एल.एम .सरदार हायस्कूलजवळ केली जाणार आहे.१ कोटी ७० लाख रुपये हा पादचारी पूल उभारला जाणार आहे.
या प्रभागातील माजी नगरसेवक सईद बेग,अब्दुल गणी डॉलर,नासीर पठाण,कैसर पेंटर, यांनी पादचारी पुलाची मागणी केली होती.त्यांच्या मागणीनुसार अर्थसंकल्पात या पुलासाठी १ कोटी ७० लाखाची तरतूद करण्यात आली. मंगळवारपासून पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे आ.फारुक शाह यांनी स्थळ पाहणी केली .यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर .आर.पाटील, अभियंता झाल्टे,किरण पाटील,श्री. ईशी ,मनपाचे अभियंता नवनीत सोनवणे ,प्रदीप चव्हाण,हेमंत पावटे,आदी उपस्थित होते.


Social Plugin