५० लक्ष रुपये खर्चातून प्रभाग १९ मध्ये वॉल कंपाऊंड कामाचे आ.फारुक शाहांचे हस्ते शुभारंभ.

 






धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा सुविधांच्या विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मध्ये सर्वे नंबर ४३८ येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड करणे या ५० लक्ष रुपये खर्चाच्या कामाच्या शुभारंभ आ.फारुक शाह यांचे हस्ते आज करण्यात आला. सर्वे नंबर ४३८ मधील खुल्या जागेत अतिक्रमण होवू नये म्हणून परिसरातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी ओपन स्पेस मध्ये वॉल कंपाऊंड करण्यात यावे याबाबत निवेदन दिलेले होते याची तात्काळ दखल घेत आ. फारुक शाह यांनी या कामासाठी शासनाकडून ५० लक्ष रुपये मंजूर करून घेतले होते व त्याचे आज शुभारंभ करण्यात आले. धुळे शहरातील अनेक ओपन स्पेशजागेवरती नागरिकांनी अतिक्रमण केलेले होते तसेच अनेक जागेवर भूमाफिया यांनी सुद्धा कब्जा केलेला होता याबाबत आ.फारुक शाह यांनी अभ्यास करून धुळे शहरातील अनेक जागेवरती वॉल कंपाउंड साठी करोडो रुपयांच्या निधी आजपर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे त्याचे एक भाग म्हणून स.न.४३८ च्या खुल्या जागेस वॉल कंपाऊंड साठी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले आहे व त्याचा आज शुभारंभ आ.फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आले.सलिम बेग मिर्झा यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या आ.फारुक शाह यांचे सोबत माझी नगरसेवक आमिर पठाण,माज इम्रान आझमी, गनी डॉलर, गोपाल अन्सारी,डॉ.दीपश्री नाईक,मौलाना शकील,प्यारेलाल पिंजारी,इकबाल शाह,अनिस शाह,खालिद नोकिया, शादाब शाह,रफिक शाह,माजीद पठाण,हारून खाटीक, अझहर सैय्यद, फूझेल  आझमी,सउद सरदार,जावेद खाटीक,डॉ.बापुराव पवार,एजाज खान,जाकीर अन्सारी,आझम अन्सारी, असलम अन्सारी,वजीर शेख,महमद अली अन्सारी,जमील अन्सारी,खलील बेग,सलिम बेग मिर्झा,आसिफ अन्सारी,रज्जाक पठाण,जावेद खाटीक, अब्दुल्ला  खान, हलिम शमसुद्दिन,वसीम शेख,इद्रिस शेख,नजर पठाण,सउद आलम,जुबेर शाह,समीर शाह,शादाब खाटीक,समीर मिर्झा, हाशम अन्सारी, खलील मिर्झा शाळेतील चेअरमन  मुख्याध्यापक व शिक्षक गण तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व नगरसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशपाक शेख यांनी केले .