दोन भावंडांचा तीन दिवसात 22 गावात झंझावाती प्रचार

 





मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व लघुउद्योजक विकी बाबा - पाटील या दोन भावंडांचा तीन दिवसात चांदसर , दोनगाव बु.,  टहाकळी, आव्हाणी, भोकणी, पथराड बु. पथराड खु., लाडली फुलपाट पाळधी बु. पाळधी खु.,धार, शेरी,  कवठळ,  दुसखेडा, एकलग्न, पोखरी तांडा,  दोनगाव खु. झुरखेडा,  निमखेडा, तारखेडा सह इतर 22 गावांमध्ये झंझावाती प्रचार करून मतदाराशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी गुलाबराव पाटील यांना आशीर्वाद देऊन भक्कम पाठबळ असल्याची ग्वाही दिली. धनुष्यबाण व गुलाबराव पाटील व नेत्यांचे लहान मोठे कट - आउट,  भगवे रुमाल, टोप्या व मुखवटे यांचा उपयोग केल्याने प्रचार रॅलीत युवकांचा उत्साह व जनतेचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसून येत होता.  प्रचार रॅलीमध्ये पदाधिकारी,  कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.