शिंदखेडा विधानसभा मतदार संघातून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी भव्यदिव्य शक्तीप्रदर्शनाने आपल्या विजयाची तुतारी फुंकली .त्यांनी महारॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.ढोल ताशे , बँड पथकाच्या गजरात निघालेली ही रॅली लक्षवेधी ठरली. रॅलीत संदीप बेडसेच्या विजयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहरातील कार्यालयापासून संदीप बेडसे यांच्या रॅलीला सुरुवात झाली. रॅलीतील रथावर उभ्या संदीप बेडसेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नागरिकांना हात उंचावून साथ देण्याचे आवाहन केले.यावेळी कार्यकर्ते तरुणांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. प्रत्येकाच्या हातात पक्षाचे ध्वज, ढोल ताशे, बँड पथकासह विविध वाद्यांमुळे रॅलीला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संदीप बेडसे यांची जाहीर सभा झाली. रॅलीत माजीमंत्री डॉ. हेमंत देशमुख, राष्ट्रवादीचे निरीक्षक उमेश पाटील , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कामराज निकम, माजी नगराध्यक्ष जुईताई देशमुख , हेमलता शितोळे , जिल्हाध्यक्ष उषा पाटील, शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे , गिरीश देसले ,नितीन चौधरी,दीपक अहिरे, अरुण पाटील,डॉ.बोरसे आदीसह महाविकास आघाडीचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Social Plugin