वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी काल धुळे शहर विधानसभेसाठी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ (जितुभाऊ) यांना उमेदवारी घोषित केली आहे.अशी माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अरविंद निकम म्हणाले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी नियमित फक्त आणि फक्त मानवतेचे, गोरगरीब ,वंचित , पिढीत,शोषित,स्वाभिमानी , आणि येथील दु:खी लोकांच्या हिताचे राजकारण केले आहे.बाळासाहेब आंबेडकर हे एक स्वाभिमानी , हुशार , बुद्धिमान तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे चालणारे बाबासाहेबांचे नातू आहेत. व बाबासाहेबांचे विचारांचे व रक्ताचे वारसदार आहेत.त्यांनी तेथील बहुजन, आदिवासी, ओबीसी, एससी,एसटी, व अन्य छोट्या जातींसाठी केलेल्या संघर्षाने प्रेरित होऊन जितेंद्र शिरसाठ यांनी वंचित आघाडीकडून निवडणूक लढवित आहेत.जितेंद्र शिरसाठ यांनी धुळे महापालिकेत १५ वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेले आहे .तसेच स्थायी समिती सदस्य , जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच शासनाच्या पदांवर काम करण्याचा प्रयत्न त्यांना मोठा अनुभव त्यांनी त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रभागात मोठमोठी विकास कामे केलेली आहेत भिमतिर्थ ,गौतम बुद्ध यांचे स्मारक तसेच भिमा कोरेगाव स्तंभासह प्रभागातील इतरही कामे त्यांनी केलेली आहेत.त्याचप्रमाणे नगरसेवक नसतांना देखील त्यांच्या प्रभागासह इतर प्रभागात देखील त्यांनी विकास कामे केलेली आहेत.म्हाडाचे २४० घरे मंजुर करून गोरगरिबांना मिळवून दिले आहेत.घरकुल योजनेत त्यांनी महापालिकेचा दवाखाना देखील जनतेसाठी चालू करून दिला आहे.त्याच ठिकाणी त्यांनी युवकांसाठी सुसज्ज अशी व्यायामशाळा देखील सुरू केलेली आहे.मोती नगर,शनी नगर, भिम नगर,यशवंत नगर, आदी अतिक्रमित झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरिबांना त्यांनी त्यांच्या जागेचा ७/१२ उतारा मिळवून दिला आहे. तसेच अनेक बेघर वासियांना त्यांनी घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळवून दिली आहेत. सन २०२३-२४ पर्यंत ३ कोटीची विकास कामे मंजूर केलेली आहेत.आदिवासी वस्ती जमनगिरी येथे नुकतेच ९९ लाख रुपये किमतीचा पुल मंजूर केला आहे. शासकीय कामाचा २२ वर्षांपासून अनुभव असल्याने विकास कामे कशा पद्धतीने मंजूर करतात याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज , राजमाता अहिल्याबाई होळकर, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच बहुजन समाजातील सर्व महापुरुष व संत महात्मे यांना अभिप्रेत असलेली बहुजन हिताय , बहुजन सुखाय, या वाक्याप्रमाणे लोकशाही प्रस्थापित करण्याचा त्यांचा मानस आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम म्हणाले .पत्रकार परिषदेस बापूसाहेब रविकांत वाघ,जितेंद्र शिरसाठ,शंकर अण्णा खरात, इकबाल तेली,आकाश बागुल, चंद्रमणी वाघ , फकुद्दीन खाटीक, योगेश पगारे,सागर चव्हाण, सिरातल खाटीक,मुन्ना सरकार ,रहीम पटेल,मुस्तकीम खान, रघु खोटे,गणेश जगदेव,आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते .


Social Plugin