बहुजन नायक ,आझाद समाज पार्टी आणि भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष खासदार अँड.चंद्रशेखर आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत धुळे शहरात सोमवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता संतोषी माता मंदिर चौक साक्री रोड धुळे येथे जय भीम..जय जोहार बहुजन हक्क परिषद होणार आहे.भाई चंद्रशेखर आझाद हे खासदार निवडून आल्यानंतर महाराष्ट्रात त्यांची ही पहिलीच जाहीर सभा आहे.अशी माहिती आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद साहेबराव लोंढे यांनी दिली.याबाबत सविस्तर माहिती देताना आनंद लोंढे म्हणाले की,दलीत, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक , आर्थिक मागासवर्गीय ,शेतकरी ,कामगार ,महिला,युवक विद्यार्थी व उपेक्षित वर्गाच्या प्रश्नांसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.ही सभा नसून एक जन आंदोलन आहे यावेळी उपस्थित जनसमुदायाला खासदार अँड. चंद्रशेखर रावण हे संबोधित करतील या परिषदेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून जय्यत तयारी करण्यात आली आहे.परिषदेचा शहरी आणि ग्रामीण भागात जोरदारपणे प्रचार करण्यात आला असून हजारोंच्या संख्येने या परिषदेला दलित बहुजन आदिवासी मुस्लिम व इतर सर्व समाज घटकातील जनता उपस्थित राहणार आहे . असेही आनंद लोंढे यांनी सांगितले.कैलास ताराचंद धुळकर,भीम आर्मीचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल वाघ ,समता संघाचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड ,आदिवासी संघटनेचे प्रमुख राजाराम साळवे , सत्यशोधक कष्टकरी शांताराम वामन पवार,आझाद समाज पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर,भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण,भीम आर्मीचे शहराध्यक्ष निशांत मोरे ,जिल्हा संघटक महिंद्र बोरसे उपस्थित होते.


Social Plugin