हद्दपारीचे आदेश तरी तलवार घेऊन माजवत होता दहशत. अट्टल गुन्हेगाराला शहर पोलिसांनी केली अटक.

 


जळगाव प्रतिनिधी




हद्दपारीचे आदेश असताना  शहरात फिरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला तलवारीसह शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,  अंकुश मधुकर सुरवाडे वय-१९, रा. गेंदालाल मिल, जळगाव असे अटक केलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंकुश सुरवाडे रा. गेंदालाल मिल जळगाव याला जळगाव शहरातून जिल्हाधिकारी यांनी हद्दपारचे आदेश काढलेले आहेत, असे असताना देखील तो जळगाव शहरातून लोखंडी तलवार घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती जळगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या शुक्रवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत अट्टल गुन्हेगार अंकुश मधुकर सुरवाडे वय १९, रा. गेंदालाल मिल, जळगाव याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांचाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल किशोर निकुंभ हे करीत आहे.