भाजपकडून राजू मामांना तिसऱ्यांदा उमदेवारी जाहीर.











भाजपकडून आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून भाजपकडून पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात जळगावचे आमदार  सुरेश भोळे राजू मामा यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 




याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं खरं बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. यात जामनेर मधून गिरीश महाजन, चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण यांना उमदवारी जाहीर झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे राजू मामा यांना भाजपकडून उमेदवारी मिळते की नाही ? यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते.  मात्र राजू मामानी केलेल्या कामाची पावती म्हणून आज तिसऱ्यांदा भाजप कडून राजुमामांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.