धुळे - धुळे शहर मतदार संघाचे आमदार फारुक शाह यांनी राज्य शासनाच्या महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना, अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती विकास योजना,पर्यटन विकास योजना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत गेल्या चार महिन्यात शहराच्या विकासासाठी जो निधी आणला आणि त्यातून १०१ पेक्षा जास्त कामे मंजूर करून घेतली अशा कामांचा शुभारंभ सोहळा आज क्युमाईन क्लब जवळ,जेलरोड येथे संपन्न झाला.याप्रसंगी राज चव्हाण, ऍड.पुंजाराम सानप,देविदास जगताप, ऍड.तुषार ससाणे,डॉ.दीपश्री नाईक,पत्रकरसंघाचे मनोज गर्दे,दै. श्रमराज्य चे अतुल पाटील यांची यथोचित भाषणे झाली.आ.फारुक शाह यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात देशातील जातीवादी धर्मांध पक्षांचा समाचार घेतला.आणि मी केलेल्या विकास कामांमुळे शहरात भाईचारा निर्माण झाला.आ.फारुक शाह यांचे सोबत मंचावर सलिम शाह,मनोज गर्दे,अतुल पाटील,राजु गर्दे,रामेश्वर चत्रे,धम्मचारी अचलाज्योती,नासिर पठाण, मुक्तार अन्सारी,मौलवी शकील, भोलू शाह,राज चव्हाण,निजाम सैयद,डॉ.दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी,जगताप साहेब,बंडू गांगुर्डे,निकुंभ जिभाऊ,रफिक शाह,जाधव, जाहीद हाजी, सईद बेग,साजिद साई,आमिर पठाण, सिराजुद्दिन शाह,डॉ. शराफत अली, अफसर शाह, आदी मान्यवर उपस्थित होते.१०१ कामांच्या प्रतिकृती फलकाचे अनावरण करून संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवी सचिन बागुल यांनी केले तर आभार परवेज शाह यांनी केले.


Social Plugin