धुळ्यातील प्रेरणास्थानांचे सौंदर्य बहरणार... मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरींच्या मंजूर निधीतून राणी लक्ष्मीबाई स्मारकाचे सुशोभिकरण मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ





धुळे- आज  नवीन आणि जुन्या मनपाजवळ असलेले विरांगना झाशी राणी लक्ष्मीबाई स्मारकाचे सुशोभीकरणाचे भूमीपूजन दि. ११/१०/२०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आले होते.

यावेळी माजी केंद्रीय संरक्षणराज्य मंत्री डॉ सुभाष भामरे , माजी आमदार राजवर्धन कदमबांडे,मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांच्यासह सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

धुळे शहरात फार वर्षां पासून महापुरुषांचे पुतळे स्थापन झालेले आहेत.परंतु अनेक वर्षांचा कालावधी गेल्याने सद्यस्थितीत या पुतळयांच्या दुरावस्था झालेली होती.

त्यामुळे सदर बाब लक्षात घेऊन धुळे महानगरपालिकेच्या तत्कालीन महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी सदर पुतळयांचे सुशोभिकरण करणेबाबत मनपा आयुक्तांना पत्र देवुन सुचना केल्या होत्या. यावेळी प्रास्ताविक करताना मा महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी सांगितले की भारतात जेव्हा महिला सक्षमीकरणाची चर्चा होते तेव्हा तेव्हा महान विरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची गोष्ठ मोठ्या अभिमानाने सांगीतली जाते.त्या तमाम महिलांसाठी एक आदर्श प्रेरणास्पूर्ती राहिल्या आहेत.

महिलांच्या सन्मानाचे स्वातंत्र्यसंग्रामातील अतुलनीय पराक्रमी त्याग मूर्ती म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा गौरव आहे.त्यामुळे महिलांना त्यातून स्फूर्ती येऊन ऊर्जा व प्रेरणा मिळावी यासाठी या पुतळ्याची सुशोभीकरण महिला वर्गासाठी अत्यंत अभिमानाची बाब होती. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ रोजी काशीतील वाराणसी येथे झाला होता.त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई होते.लहानपणी त्यांचे नाव मणीकर्णिका होते.वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला होता.अखेर इंग्रजांशी भयंकर लढाई लढत असताना १८ जून १८५७ रोजी वीरगती प्राप्त झाली.

 त्यामुळे सदर स्मारक विकसीत करण्यासाठी धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातुन विकास शुल्क अंतर्गत तत्कालीन महापौर सौ प्रतिभाताई चौधरी यांनी धुळे शहरातील झाशी राणी पुतळा सुशोभीकरणासाठी २० लक्ष रुपये मंजूर केले होते.

त्यायानुसार आज दिनांक ११/१०/२०२४ वार शुक्रवार रोजी ठीक सकाळी ११.०० वाजता सदर पुतळा सुशोभीकरणाचा शुभारंभ सर्व मान्यवर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सदर २० लक्षच्या निधीतून संपूर्ण स्मारक आणि परिसरातील भागात विद्युत रोषणाई,सुंदर आकर्षक स्तंभ,घुमट,रेलिंग विकसित केले जाणार आहे. 

तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा व लोकमान्य टिळक पुतळा,माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या सर्व वीरपुरुषांचे स्मारक सुशोभिकरण महानगरपालिकेमार्फत करण्याचे मंजूर झाले आहे.यामुळे धुळे शहराच्या सौंदर्यातही वाढ होणार आहे.

त्यापैकी सुमारे २० लक्ष  रुपये खर्चाच्या झाशी राणी लक्ष्मीबाई पुतळयाचे सुशोभिकरणाचा कामाचे भुमिपुजन शुभारंभ कार्यक्रम दि.११/१०/२०२४  वार शुक्रवार रोजी सकाळी ११.०० वाजता माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. सुभाषजी भामरे, मा. आ. श्री. राजवर्धनजी कदमबांडे,सो. भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर,माजी जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल,माजी महापौर सौ जयश्री अहिरराव,मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील,संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर ,दैनिक मर्डरचे  संपादक राजेंद्र गर्दे,दैनिक खान्देश मैदानचे संपादक मनोज गर्दे,दैनिक श्रमराज्यचे  संपादक अतुल पाटील, ओमभैय्या खंडेलवाल,सुधीर पोतदार,गीता कटारिया,आकाश परदेशी,पवन जाजू,प्रकाश उबाळे,शेखर कुलकर्णी,राम अग्रवाल,काशिनाथ पोतदार,नंदू ठोंबरे,कमलाकर पाटील,प्रकाश पाटील,गोकुळ साळुंखे,शरद बिरारी,शिवाजीराव काकडे ,प्रशांत बागुल,शिवाजीराव चौधरी,सूरज चौधरी,रमेश करंकाळ,सतीश बागुल,भूषण गवळी,गोपाल चौधरी,उषाताई वानखेडे, यांच्यासह 

मनपा  नगरसेवक ,भाजपा पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी धुळे शहरातील नागरिक,महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर स्मारकाचे कामाचे सूचक व संकल्पना  माजी महापौर प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी आहेत.याकरिता मनपा प्रशासक तथा आयुक्त अमित दगडे पाटील,नगरसचिव मनोज वाघ,शहर उपअभियंता चंद्रकांत उगले रावसाहेब,इंजी प्रणव शिंदे आदींचे सहकार्य लाभले होते.सदर कामाचे ठेकेदार प्रदीपभाऊ पानपाटील आहेत.