धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात बालविवाह व महिला अत्याचाराबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.





शहरातील सप्तशृंगी महिला संस्थेच्या अध्यक्षा मिना भोसले यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.आज शहरातील पोलीस केंद्र येथे बालविवाह  रोखण्यासाठी जनजागृती करीत शपथ घेण्यात आली.यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्रचे उपप्राचार्य राहुल फुला , जयवंत पगारे ,सखी वन बोला स्टॉपचे  अधिकारी अँड.गायत्री भामरे, अँड. भाग्यश्री वाघ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  तृप्ती पाटील,प्रकल्प सम्वयक  प्रतीक्षा  मगर,पोलीस निरीक्षक सतीश वळवी ,माधवी वाघ , आदीसह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरालाल भोहले यांनी केले.तर  सूत्रसंचालन जयश्री ठाकूर ,विशाल सर, हर्षला मिस्त्री, ललिता पाटील , यांच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील   विद्यार्थी उपस्थित होते. सप्तशृंगी महिला संस्थांच्या वतीने  आजपर्यंत १ लाख ७२ हजार ९३० एचआयव्ही , एड्स रुग्णांची तपासणी केली आहे.३४५ लोकांना  शबरी आवास योजना व रमाई आवास घरकुल योजनेचा माध्यमातून लाभ देण्यात आले आहे.संजय गांधी निराधार योजनेतील  २८५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले , मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण  योजनेचा ९६० महिलांना लाभ मिळवून दिला,९८ या हेल्पलाईन सर्विसाचा माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातून ७५० बालविवाह थांबविण्यात आले असून बाराशे ८० बाल कामगारांची मुक्तता करण्यात आलेली आहे. रस्त्यावरची भीक मागणारी ३४० मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात संस्थेच्या माध्यमातून  आलेल्या आहेत. आणि संस्थेच्या माध्यमातून आजपर्यत  धुळे जिल्ह्यात सामाजिक ,शैक्षणिक , आर्थिक क्षेत्रामध्ये कार्य चालत असतात बालविवाह मुक्त भारत या प्रकल्पातून  संपूर्ण धुळे जिल्ह्यातून २०३० पर्यंत बाल विवाह मुक्त करायचा निर्धार करण्यात आला.