वंचितच्या जोरदार शक्तीप्रदर्शनाने विरोधकांना धडकी जितेंद्र शिरसाठ यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल.




धुळे शहर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुती व महाविकास आघाडीकडून  दंड थोपटले जात असताना वंचित बहुजन आघाडीही पूर्ण ताकदनिशी मैदानात उतरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जितेंद्र शिरसाठ यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.निळ्या झेंड्यासह काढण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शन रॅलीत हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला व पुरुष  सहभागी झाले होते.

वंचित बहुजन आघाडीतर्फे धुळे शहरातून माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण जोर लावल्याचे चित्र आहे. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भिमनगर पासून  या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख  मार्गावरून काढण्यात आलेल्या या  रॅलीने धुळेकरांचे लक्ष वेधून  घेतले होते.

या रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे चेतन गांगुर्डे, अरविंद निकम, रविकांत वाघ, शंकरअण्णा खरात,योगेश पगारे,राहुल पाटोळे,आकाश बागुल,अमोल पवार,सागर चव्हाण,रोहित पटेल, सिरातन खाटीक,फकरूद्दीन  खाटीक,चंद्रमणी वाघ यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.