धुळे - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२४-२५ अंतर्गत प्र. क्र.१७ गुरुकृपा नगर चितोड रोड येथे सभागृह बांधणे. या २५ लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते चितोड रोड येथील गुरुकृपा नगरमध्ये करण्यात आला.माधव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास गणी डॉलर,डॉ.दीपश्री नाईक, डॉ.शराफत अली,निजाम सैय्यद,सुरेश अहिरे,नगरसेवक शिरपूर,भिलाजी आहिरे,हमीद शाह,आसिफ शाह , शहजाद मंसूरी, कैसर अहमद,फातेमा अन्सारी,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.गुरुकृपा नगर आणि परिसराचा मुख्य प्रश्न म्हणजे राहती घरे नियमानुकुल करण्याचा याबाबतीत रहिवाश्यांनी समस्या मांडली.त्यानुसार आ.फारुख शाह यांनी रहिवाशी घरे नियमानुकुल करण्याचे अभिवचन दिले.याप्रसंगी भीलाजी अहिरे,सुरेश अहिरे,सिद्धार्थ जगदेव यांनी मनोगत व्यक्त केली.आ.फारुख शाह यांनी शहरातील सर्व घटकांना सोबत घेत विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यात प्रामुख्याने खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी ,फुले नगर,प्रबुद्ध कॉलनी, नकाणे रोड येथे बुद्धविहार,देवपूर येथे संत रविदास अभ्यासिका,१५० वर्ष जुने असलेल्या कॅथोलिक चर्च,गुरुद्वारा यासाठी मोठ्याप्रमाणात निधी राज्य शासनाकडून खेचून आणला.सद्यस्थिती सर्व कामे प्रगती पथावर आहेत.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र पवार,पवन अहिरे,दत्तू शिंपी,कृष्णा अहिरे,राज अहिरे,सोमनाथ पवार,किशोर अहिरे,शंकर शिरसाठ,दत्तू सूर्यवंशी,किशोर अहिरे,विनोद अहिरे,महेंद्र रखमे,अनिल अहिरे,राजु पाथरे,संजय सुर्यवंशी,यशोदा अहिरे, छोटा बाई रखमे,सविता अहिरे, लक्ष्मी अहिरे ,आशाबाई हिरे,कुसुम अहिरे,शांताबाई शिरसाठ,कविता शिंपी,कल्पना शिरसाठ यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल लोंढे यांनी केले आभार रवींद्र अहिरे.


Social Plugin