आरक्षण बचाव संघर्ष समितीचा उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.

 


अनुसूचित जाती जमातीचे उप वर्गीकरण व क्रिमीलेयर रद्द करा या मागणीसाठी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने उद्या 7 ऑक्टोबर 2024 रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती छत्रपती ग्रुपचे मार्गदर्शक सतीश गायकवाड यांनी पोलीस चौफेर न्युजला दिली आहे. 




उद्या 7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता रेल्वे स्थानक येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात करण्यात येणार आहे. यांनतर 

अनुसूचित जाती जमातीचे उप वर्गीकरण व क्रिमीलेयर रद्द करण्यासह समाजाच्या विविध मांगण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असून, या मोर्च्यात समाजबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशे आवाहन आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुकुंद सपकाळे व सतीश गायकवाड यांनी केले आहे.