रावेर प्रतिनिधी.
आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर असून यात रावेर यावल मतदार संघातून धनंजय शिरीष चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रावेर यावल मतदार संघात काँग्रेसकडून धनंजय शिरीष चौधरी भाजप कडून अमोल हरिभाऊ जावळे, प्रहार जनशक्ती पक्षाकडून अनिल छबीलदास चौधरी हे विधानसभेच्या रींगणात उतरले असून सर्वांची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळे या मतदार संघात काटे की टक्कर अशी लढत होणार आहे . दरम्यान धनंजय चौधरी यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वच जण जोमाने कामाला लागले आहेत.


Social Plugin