धुळे - सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे,विशेष रस्ता दुरुस्तीअंतर्गत आग्रारोड मोठापुल ते डायव्हर्सन रोड पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे व दुभाजक बनविणे या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे शुभहस्ते करण्यात आला.डायव्हर्सन चौकात संपन्न झालेल्या कार्यक्रमात आ.फारुख शाह यांनी महानगरपालिकेच्या आकार्यक्षमतेचे वाभाडे काढले.देवपूरकर नागरिकांचा गेल्या चार वर्षांपासून महानगरपालिका अतोनात छळ करीत आहे.भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे देवपूर भागातील रस्त्यांची चाळण करून टाकली आहे. एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयासमोर सुमारे चार ते पाच वर्षांपासून काम चालू होते.यासंदर्भात लोक उपहासाने म्हणायचे की महानगरपालिकेकडून धुळ्यात तेल विहीर खोदायचे काम चालू असून जोपर्यंत भूगर्भात खनिजतेल मिळत नाही तोपर्यंत काम चालूच राहणार आहे आणि खुप प्रयत्नांनी अंतिमतः पालिकेस तेलसाठा सापडला व आग्रारोडचे भूमिगत गटारीचे काम पूर्णत्वास आले.अशी शेरेबाजी ऐकून देखील मनपा तत्कालीन सत्ताधारी आणि प्रशासनाला काहीएक फटका पडत नव्हता.या रस्त्यावर अनेकवेळा अपघात होवून नागरिकांना गंभीर जखमी व्हावे लागले.कुणाचे कंबरडे मोडले,कुणाचे हात पाय जायबंदी झालेत तर पडल्यामुळे कुणाचे दात पडले.याच रस्त्यावर पाच शाळा आणि तीन महाविद्यालय
येतात या रस्त्यावरून शहरातील प्रभाग क्र.१,२,३ व ४ मधील नागरिकांची सतत वर्दळ असते तर शहरातून नंदुरबार ,शिरपूर आणि इंदूरच्या दिशेने जायचे असेल याचं रस्त्याचा उपयोग करावा लागतो.असा ऐतिहासिक जुना आग्रारोड मोठापुल ते डायव्हर्सन रोड पर्यंतचा रस्ता भूमिगत गटार योजनेमुळे अत्यंत दयनीय झाला होता.आ. फारुक शाह यांनी देवपूरकर नागरिकांना मनपाच्या दुष्टचक्रातून सोडविण्याचा चंग बांधला होता.या रस्त्याच्या नुतनिकरण आणि दुभाजक नवीन करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष रस्ता दुरुस्ती अंतर्गत ११ कोटीचा निधी मंजूर करून आणला आहे.या कामामुळे संपूर्ण देवपूरकर नागरिकांची सुविधा होणार असल्याचे आ.फारुक शाह यांनी सांगितले.आ.फारुक शाह यांचे सोबत यावेळी नासिर पठाण, मुक्तार अन्सारी ,डॉ. दीपश्री नाईक, सईद बेग,निजाम सैयद, जाहिद हुसेन,अनिस शाह,आसिफ शाह,इकबाल शाह, डॉ.बापुराव पवार,भिखनराव पाटील,एकनाथ साळुंखे,फकिरा बागवान,रफिक शाह,अशोक सगरे,सुभाष निकम,रफिक काझी,समीर शाह,आदी उपस्थित होते.


Social Plugin