धुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध:- संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष हेमंत भडक





संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा तर्फे १५ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता,


 

धुळे जिल्हा औद्योगिक दृष्ट्या मागासलेला आहे, हजारो तरुण आपले शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतात, परंतु आता एमपीएससी यूपीएससी या सेक्टर मधून शासकीय नोकऱ्या मिळतात, त्यामुळे बरेचसे तरूण बेरोजगार असतात, धुळ्यात न विकसित औद्योगिक क्षेत्र आहे, ना व्यापाराला पूरक साधने आहेत त्यामुळे युवकांना रोजगार मिळत नाही त्यामुळे संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा तर्फे सर्व समाजातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जिजाऊ संकुल मराठा सेवा संघ कार्यालय गणपती पुलाजवळ देवपूर धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर येथील नामांकित कंपनी व शासकीय निमशासकीय कॉन्ट्रॅक्ट बेसवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे,

संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा आयोजित धुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील सुशिक्षित बहुजन समाजातील तरुण तरुणींना रोजगाराची सुवर्णसंधी या धुळ्यात आयोजन करण्यात आले,या मेळाव्याला जिल्ह्यातील १६५ तरूण बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, या युवकांना मुलाखती दिल्या त्या युवकांना पुढील प्रक्रियेसाठी लवकरात लवकर बोलावण्यात येईल,असे प्रतिपादन बॅक व उद्योग क्षेत्रातील भूषण पाटील यांनी केले

मराठा सेवा संघ कार्यालय येथे बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक प्रकाश पाटील, डॉ योगेश ठाकरे,मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष मा लहुबापु पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मा मिनाताई भोसले,मा आनंद पाटील सर, जिल्हा अध्यक्ष हेमंत भडक जिल्हा सचिव महेश पाटील 

वाहतूक आघाडी अध्यक्ष मनोज रुईकर महानगर प्रमुख अमर फरताडे, कामगार आघाडी अध्यक्ष सुनील पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष दिपक नांद्रे, जिल्हा उपाध्यक्ष नंदू अहिरराव, माजी तालुकाध्यक्ष नितीन पाटील प्रमुख पाहुणे होते 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाटील,अमर फरताडे यांनी केले, प्रास्ताविक मनोज रुईकर यांनी केले, मार्गदर्शन मुंबई चे एच आर भुषण पाटील यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आले, त्यांनी मार्गदर्शन केले, आनंद पवार,मिनाताई भोसले,लहुबापु पाटील, कार्यक्रम चे अध्यक्ष मा प्रकाश पाटील यांनी आपल्या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार कसा टिकावा या सर्व अनुभव यांनी सांगितले 

कार्यक्रमाचे आभार जिल्हा कार्याध्यक्ष दीपक नांद्रे यांनी केले.