परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ जळगावात धरणे.

 






परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरच्या भारतीय संविधानाची एका समाजकंटकाने १० डिसेंबर रोजी दुपारी साडेपाच वाजे दरम्यान विटंबना केली होती. नंतर पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलिसांनी कोठडीत केलेल्या जबर मारहाणमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालासमोर आंबेडकरी प्रेमी जनतेने आज धरणे आंदोलन केले.

यावेळी कोठडीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, संबंधित पोलिसांवर सदस्य सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, परभणी बंदच्या काळात ज्या निरपराध लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सतीश गायकवाड विजय सुरवाडे, मुकुंद सपकाळे, अजय गरुड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.