शहरातील वाडीभोकर रोडवरील स.नं .३५/४ प्लॉट नं.५, श्रीराम नगर, मधुबन कॉलनी परिसरात होणाऱ्या नियोजित दारू दुकानाला नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. हे दुकान या परिसरात होवू नये, अशा आशयाचे निवेदन श्रीराम सर्वांगीण विकास संस्था (श्रीराम मंदिर व हनुमान मंदिर), श्रीरामनगर , मधुबन कॉलनीमध्ये महिला तसेच रहिवाशांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, स .न.३५/४, प्लॉट नं ५, श्रीराम नगर, वाडीभोकर रोड या ठिकाणी मद्य व्यवसाय सुरू होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या व्यवसायास सर्व अर्जदार यांची तीव्र हरकत असून व्यवसायाला परवानगी मिळावी या कामी सदर व्यवसाय मालकाने राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच परवानगी संदर्भात इतर शासकीय कार्यालयांमध्ये अर्ज केलेला आहे. हा अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी केली आहे. या व्यवसायाच्या ठिकाणी लागूनच श्रीराम मंदिर व श्रीहनुमान मंदिर दोघे मंदिर नोंदणीकृत आहेत. तसेच दंडेवाले बाबा यांचा नोंदणीकृत दर्गा आहे. या व्यवसायाच्या ठिकाणाला लागूनच नर्सरी ते ज्यु . सिनियर के.जी वर्ग असणारी शाळा आहे. मुलींचे वसतीगृह तसेच अभ्यासिका आहेत. वसतीगृहा मध्ये सर्व मिळून २०० ते ३०० मुलींचे वास्तव्य आहे. या ठिकाणीच इमारतीमध्ये अनेक सुशिक्षित कुटुंब राहत असून तसेच मुलींचे वसतीगृह देखील आहे. स्त्री रोग तज्ञ श्री ठाकरे यांचे नोंदणीकृत हॉस्पिटल असून तसेच स्त्री रोग तज्ञ डॉ. सुनिल नाईक यांचे देखील नोंदणीकृत हॉस्पिटल आहे. अनेक शैक्षणिक क्लासेस असून त्यामुळे हा परिसर विद्यार्थ्यांनी कायम गजबजलेला असतो. जळगाव जनता सह बँक असून या बँकेमध्ये देखील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला ,विद्यार्थी तसेच सुशिक्षित नागरिकांचे येणे जाणे असते . त्यामुळे दारू दुकानाला परवानगी देवू नये अशी मागणी करण्यात आली आहे.


Social Plugin