ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे स्वाक्षरी मोहीम सुरू

 

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत वंचित बहुजन  आघाडीच्या वतीने ईव्हीएम विरोधात श्रद्धेय प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने सह्याची मोहीम राबविण्यात आली. 



संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्याने त्यावर  ईव्हीएम हॅक करून  निवडणुका  जिंकता येतात.हे सिद्ध झालेले आहे. बऱ्याच विचारवंत आणि  टेक्निकली ज्ञानी असलेल्या लोकांनी असा दावा केला असून देशभरात ईव्हीएम विरोधात सह्यांचे मोहीम राबवलेली आहे.धुळे जिल्ह्यात दहा हजार साह्यांचे दिवसभरात टारगेट पूर्ण करणार आहे. १६ डिसेंबर पर्यंत सह्यांची मोहीम सुरू असणार आहे.या निवडणूक आयोगाला पाठवल्या जाणार आहे.यावेळी एस.यु तायडे , सुरेश लोंढे,महेंद्र महाले, प्रभाकर खंडारे, जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जितेंद्र शिरसाठ,जिल्हा संघटक शंकर खरात ,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ, आकाश बागुल,विशाल महाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.