महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही बसवून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात यावा ऑल इंडिया पॅंथर सेनेचे निवेदन

 





शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याजवळ सीसीटीव्ही बसवून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात यावा अशा मांगणीचे निवेदन ऑल इंडिया पॅंथर सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, महापुरुषांच्या स्मारकाची विटंबना झाली म्हणून समाजात तणाव निर्माण झाल्याच्या,तसेच जातीय दंगली झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी महाराष्ट्रात घडल्या आहेत. 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे एकाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाची विटंबना  केल्याने राज्यभर याचे पडसाद उमटले.  यात परभणी येथील भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाला आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये  त्यामुळे जळगाव शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकाजवळ सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, सिसिटीव्ही नियंत्रण पोलीस स्टेशनमध्ये असावे, तसेच प्रत्येक ठिकाणी २४ तास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात यावा.  अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया पॅंथर सेनेच्यावतीने 27 डिसेंबर रोजी  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले. यावेळी महानगर अध्यक्ष राजेश साळुंखे,महानगर सचिव गोकुळ सोनवणे,महानगर उपाध्यक्ष किरण अडकमोल, महानगर संघटक शंकर सोनवणे,शांताराम सुरवाडे,सागर खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.